google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ओ गाव कारभारी सरपंच , लय भारी , रस्ते , ड्रेनेजला मिळाला आता मोठा निधी

Breaking News

ओ गाव कारभारी सरपंच , लय भारी , रस्ते , ड्रेनेजला मिळाला आता मोठा निधी

 ओ गाव कारभारी सरपंच , लय भारी , रस्ते , ड्रेनेजला मिळाला आता मोठा निधी


सोलापूर: जिल्ह्यातील सरपंच मंडळी सध्या जोरात आहेत. ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी पंधराव्या वित्त आयोगातून ४७ कोटी ३१ लाखांचा निधी आला आहे.बंधित अनुदानातून मिळालेला निधी रस्ते, ड्रेनेज व पाणीपुरवठ्याच्या ठरलेल्या कामांसाठीच खर्च करता येणार आहे.


पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी मोठा निधी येतो. यातील ८० टक्के निधी ग्रामपंचायतीसाठी तर १० टक्के निधी जिल्हा परिषद व तितकाच पंचायत समितीला दिला जातो. बेसिक अनुदानातून पहिल्या हप्त्यात जिल्ह्यासाठी ४० कोटी ९३ लाख निधी आला होता. यापैकी ग्रामपंचायतीसाठी ३२ कोटी ७५ लाख, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रत्येकी ४ कोटी ९ लाखांचा निधी वाटप करण्यात आल्याचे मुख्य लेखा वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांनी सांगितले. आता बंधित अनुदानाचा पहिला हप्ता आला आहे. यात ग्रामपंचायतीसाठी ४७ लाख ३१ हजार तर पंचायत समितीसाठी ६ कोटी ७२ हजार तर जिल्हा परिषदेसाठी ६ कोटी १४ लाखांचा निधी आला आहे. ग्रामपंचायतींना निधी वितरीत करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ग्रामपंचायतीच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी सांगितले.


असा मिळणार निधी

ग्रामपंचायतींना मिळणार

४७,३१,०७,९६२

जिल्हा परिषदेला मिळणार

६,१४,०८,०००

पंचायत समितीला मिळणार

६,००,७२,४९९

विकासकामे मार्गी लागणार

गावात रस्ते, ड्रेनेज व पाणी पुरवठ्याची अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे करण्यासाठी निधी मिळावा म्हणून सदस्यांकडून मागणी होत होती. अशात पंधराव्या वित्त आयोगातून १९ लाख मंजूर झाले आहेत. यातून ड्रेनेजची कामे मार्गी लागतील, अशी आशा आहे.

- कलावती खंदारे, सरपंच, मंद्रुप

पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला विकासकामे करण्यासाठी चांगला निधी मिळत आहे. यातून गटार व पाणी पुरवठ्याची कामे होतात. आता बंदिस्त कामासाठी निधी देण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यानुसार नियोजन केले जाईल.

-कौशल्या सुतार, सरपंच, कारंबा

गावातील पायाभूत कामे राहिली आहेत. त्यामुळे निधीसाठी पाठपुरावा सुरू होता. आता पंधराव्या वित्त आयोगातून निधी जमा झाल्याचे कळाले. यातून सांडपाणी व्यवस्थापन व पाणी पुरवठ्याची प्रलंबित कामे मार्गी लावली जाणार आहेत.

- रोहिणी जाधव, सरपंच, सिद्धेवाडी

Post a Comment

0 Comments