बाप रे। लज्जास्पद ,लग्न लावुन देत नाही म्हणून मुलाने केली वडीलाची हत्या
ऐन दिवाळीत मालेगाव तालुक्यातील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.लग्न का लावून देत नाही म्हणून मुलानेच जन्मदात्याची कुर्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करुन आरोपी मुलाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला.
पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मालेगाव तालुक्यातील जऊळका पोस्टे अंतर्गत जऊळका येथील प्रमोद धर्मा भारती (वय 27) याने 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान त्याचे वडील धर्मा भारती (वय 65) यांचेशी माझे लग्न का लावून देत नाही म्हणुन वाद घातला. दरम्यान त्याने लोखंडी कुर्हाडीने डोक्यात व पायावर वार करुन गंभीर जखमी केले.
आरोपीच्य हल्ल्यात जखमी झालेले त्याचे वडील धर्मा भारती यांना अकोला येथील सर्वोपचार रुणालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी धर्मा भारती यांचा उपचार दरम्यान रात्री 2 वाजता मृत्यू झाला. याबाबत संजीवनी महादेव भारती या महिलेने जऊळका पोस्टेला फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. व आरोपी प्रमोद भारती विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. पुढील तपास जऊळका पोस्टेशनचे पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे करीत आहेत.
0 Comments