google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रातील 'या' शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

Breaking News

महाराष्ट्रातील 'या' शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

 महाराष्ट्रातील 'या' शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा 


महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये महिलांवरील अत्याचार आणि तक्रारीसंदर्भात स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन उभारण्यात येतील. तेथे कोणीही महिला आपली तक्रार नोंदवू शकेल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी होऊ घातलेल्या शक्ती कायद्याचे प्रारूप संयुक्त चिकित्सा समितीकडे अंतिम झाले असून, विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा संमत होईल असे त्यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वळसे- पाटील यांच्या हस्ते चाकणकर यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.


गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटना यांचे विश्लेषण केले, तर 95 टक्के घटना या परिचित लोकांकडून घडत आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारीसंदर्भात मोठय़ा शहरांमध्ये स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारले जाईल. कोणत्याही महिलेला या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविता येईल असा प्रयत्न राहणार आहे. महिलांची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम आयोगाकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त करून पाटील म्हणाले, शक्ती कायद्याचे प्रारूप विधिमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीने अंतिम केले असून, त्याचा मसुदा तयार झाला आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा मंजूर होईल.


ड्रग्ज तस्करांचे नेक्सस मोडून काढणार

z शहरासह तालुका पातळीवर ड्रग्ज सेवनाचे प्रमाण वाढले ही वस्तुस्थी आहे. या संदर्भात गृहविभागाकडून कार्यक्रमाची आखणी केली जात असून, त्यामाध्यमातून ड्रग्ज तस्करांचे नेक्सस मोडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली.


आर्यन खान याचे अपहरण केले गेल्याच्या आरोपांसंदर्भात ते म्हणाले, याबद्दलचे वृत्त आपण टीव्हीवरूनच ऐकले. तपासामध्ये काय ते सिद्ध होईल. धुळय़ातील सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सपना चौधरी हिचा डान्स आयोजित केल्याबद्दल विचारले असता गृहमंत्र्यांनी असे कार्यक्रम टाळायला हवे होते अशी टिप्पणी केली.

Post a Comment

0 Comments