google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लवकरच येणार 1, 2, 5,10 आणि 20 रुपयांची नवी नाणी, अंधांनाही सहज ओळखता येणार..!

Breaking News

लवकरच येणार 1, 2, 5,10 आणि 20 रुपयांची नवी नाणी, अंधांनाही सहज ओळखता येणार..!

 लवकरच येणार 1, 2, 5,10 आणि 20 रुपयांची नवी नाणी, अंधांनाही सहज ओळखता येणार..!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या (Demonetisation) निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी ५ वर्षे पूर्ण झाली.. ८ नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्या होत्या. या निर्णयाला ५ वर्षे पूर्ण होत असतानाच, अर्थ मंत्रालयाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.. तो म्हणजे, लवकरच 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी (Coins) चलनात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.


अर्थ मंत्रालयात  जारी केलेली अधिसूचना गॅझेटमध्ये प्रकाशित झाल्यानंतर त्या दिवसांपासून हा नवा नियम अस्तित्वात येणार आहे.  त्याला 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये नियम 2021 असं संबोधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नाणी कशी असणार..?

१, २, 5, 10 व 20 रुपयांच्या नाण्याच्या दर्शनी भागावर ‘अशोक स्तंभा’वरील तीन सिंहांची राजमुद्रा असेल. तसेच ‘सत्यमेव जयते’ लिहिलेलं असेल. हिंदीत भारत, इंग्रजीत इंडिया असं लिहिलेलं असेल.


मागील बाजूला ‘आजादी का अमृत महोत्सव’चा अधिकृत लोगो व त्याखाली 20 रुपये लिहिलेलं असेल. इंग्रजीत ’75TH YEAR OF INDEPENDENCE’ असं लिहिलेलं असेल. ज्यावर्षी नाणं तयार होईल, त्या वर्षाचा उल्लेख असणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. सध्या 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी टाकसाळीमध्ये तयार करण्याचे काम सुरु आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर टाकसाळीद्वारे ही नाणी जारी करण्यात येतील. त्यानंतर त्याचा वापर सुरु होणार आहे.


सध्या १, २, ५ आणि १० रुपयांची नाणी चलनात आहेत. त्यानंतर आता २० रुपयांचेही नाणे येणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केली होती. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते या नाण्यांचे अनावरण करण्यात आले होते.

अंधही नाणी ओळखतील..

आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही नाणी लवकरच चलनात आणणार असल्याचे जाहीर केलंय. या नाण्यांची खास बाब, म्हणजे अंध आणि दिव्यांगांनाही ही नाणी ओळखता येतील, अशा पद्धतीने ती बनविण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments