प्रभाग क्र. 2 मध्ये आज व उद्या जनावरांसाठी लाळ कुरखतचे मोफत लसीकरण ः नगरसेवक सतिश सावंत
सांगोला/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्यात 3 महिन्यांच्या पुढील सर्व प्रकारच्या जनावरांना लाळ-कुरखत या सारखे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रभाग क्र. 2 मध्ये पशु वैद्यकीय विभागाच्यावतीने आज गुरूवार दि. 11 नोव्हेंबर व उद्या शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर रोजी दिवसभर घरोघरी जाऊन तीन महिन्यांच्या पुढील शेळ्या-मेंढ्या सोडून सर्व जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक सतिश सावंत यांनी दिली.
सांगोला शहरात प्रभाग क्र. 2 हा शहराचा पूर्व भाग आहे. हा शहरातील सर्वात मोठा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये देशमुखवस्ती, सलगरवस्ती, बिलेवाडी, बाबर गायकवाड वस्ती, कोठावळे-शिंदेवस्ती, सावंतवस्ती नरूटेवस्ती, भोकरेवस्ती, कोपटेवस्ती, जानकर वस्ती, मानेवस्ती, ढोलेमळा, साळुंखेवस्ती, पवारवस्ती, बुंजकरवस्ती, जांगळेवस्ती, काटकरवस्ती, दिघेवस्ती, आनंदनगर, मणेरीवस्ती आदी भागात मोठ्या प्रमाणावर जनावरे आहेत. या जनावरांच्या सुरक्षिततेसाठी लाळ कुरखत या रोगावर लसीकरण करण्यात येणार आहे. या भागातील 3 महिन्यांच्या पुढील शेळ्या-मेंढ्या सोडून लाळी येऊ नये यासाठी जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी दोन डॉक्टरांची नेमणूक केली असून डॉक्टर प्रत्येक घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत. प्रत्येक शेतकर्यांनी डॉक्टरांना सहकार्य करावे व जनावरांना मोफत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगरसेवक सतिश सावंत यांनी केले आहे.
0 Comments