नाशिक हादरलं ! आरपीआय महिला पदाधिकारी पूजा आंबेकरची हत्या , 20 ते 25 वेळा चाकू खूपसून घेतला जीव
नाशिकमध्ये भीषण हत्याकांड घडलं आहे. ऐन दिवाळीत एका महिलेची चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे.मृतक महिलेचं नाव पूजा आंबेकर असं असल्याची माहिती समोर आली आहे. पूजा आंबेकर ही आरपीआयची महिला पदाधिकारी होती. रात्रीच्या सुमारास पूजाची हत्या करण्यात आली आहे. 20 ते 25 वार करुन निर्घृण हत्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा आंबेकर या आरपीआयच्या पदाधिकारी होत्या.
रात्रीच्या सुमारास संत कबीर नगरमध्ये राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली की, आरोपीने पूजा आंबेकर यांच्यावर चाकूने तब्बल 20 ते 25 वार केले. सोबत राहणाऱ्या इसमानेच हत्या केली असल्याचा संशय आहे. संबंधित संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे.
त्याच्यावर यापूर्वी शहरात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गंगापूर पोलीस या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी वणी येथे महिलेवर सामूहिक बलात्कार नाशिकमधील वणी येथे एका 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस घडली होती.
या घटनेने एकच खळबळ उडाली होती. वणी येथील एसटी बस स्टॅण्ड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रासोबत बस स्थानकात बसली होती. त्यावेळी तेथे आलोल्या चौघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.
जीवे मारण्याची धमकी देत या महिलेवर आरोपींनी बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. चारही संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
वणी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पत्नीचा छळ करून लुबाडला 1 कोटींचा ऐवज पत्नीचा छळ करून तिच्याकडून आणि तिच्या कुटुंबीयांकडून तब्बल 1 कोटी रुपयांचा ऐवज लुबाडल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. याप्रकरणी पीडित विवाहितेनं नाशकातील गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीसह कौटुंबीक हिंसाचार आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपी पतीसह सासू आणि सासऱ्याविरोधात एफआयआर नोंदवली आहे. या घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत. नाशिक येथील रहिवासी असणाऱ्या पीडित महिलेचं काही दिवसांपूर्वी मुंबईतील जुहू परिसरात राहणाऱ्या क्षितिज शिशिर बेथारिया (वय-32) याच्यासोबत झालं होतं. लग्न झाल्यानंतर काही दिवस आनंदात गेले. पण त्यानंतर आरोपी नवरा क्षितिज आणि सासरच्या अन्य लोकांनी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ सुरू केला. माहेरून पैसे आणण्यासाठी आरोपींनी पीडित महिलेला अनेकदा शिवीगाळ आणि मारहाण देखील केली आहे.
0 Comments