आनंदा (भाऊ) माने मित्र मंडळ,सांगोला यांच्यावतीने आज आट्या पाट्या भव्य स्पर्धेचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी) : आनंदा (भाऊ) माने मित्र मंडळ सांगोला यांच्यावतीने सांगोला शहरात प्रथमच भव्य आट्या – पाट्या स्पर्धा गुरुवार दि.7 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री ठिक 8 वाजता न्यू इंग्लिश स्कूल मैदान, वासुद रोड, सांगोला येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार अभिजीत पाटील व पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या शुभहस्ते होणार आहे.सदर स्पर्धेमध्ये विजेत्या संघास गट नेते तथा विद्यमान नगरसेवक आनंदा गोरख माने यांच्याकडून प्रथम बक्षीस म्हणून २१ हजार १ रुपये देण्यात येणार आहे, द्वितीय संघास जि. प. सदस्य अतुल मालक पवार यांच्याकडून १५ हजार १ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, युवा नेते अरुण पाटील यांच्याकडून तृतीय संघास १० हजार १ रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे, चतुर्थ संघास धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष दत्तात्रय जानकर यांच्या कडून ७ हजार १ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, पाचव्या क्रमांकाच्या संघास नगरसेवक अस्मिर तांबोळी यांच्या कडून ५ हजार १ रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर सहाव्या क्रमांकाच्या संघास गावडे पेट्रोलियमचे प्रशांत गावडे यांच्याकडून ३ हजार १ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण जि. प. सदस्य अतुल मालक पवार, नगराध्यक्षा राणीताई माने, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर यांच्या शुभहस्ते होणार आहे. ‘नगराध्यक्ष चषक’ चेअरमन जिव्हाळा गोल्ड फायनान्सचे विजय माने यांच्यावतीने देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये देविदास गावडे १ हजार १ रुपये, शरद गावडे १ हजार १ रुपये, ज्ञानेश्वर गाडेकर १ हजार १ रुपये, पिंटू धतींगे १ हजार १ रुपये, दीपक श्रीराम १ हजार १ रुपये, महादेव पारसे १ हजार १ रुपये, छोटू दौंडे १ हजार १ रुपये, दादा माने १ हजार १ रुपये यांच्यावतीने संघातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैयक्तिक खेळाडूला बक्षीस दिले जाणार आहे.
स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येक संघास प्रवेश फी ५०० रुपये असणार आहे. मा नगरसेवक माऊली तेली यांच्याकडून अन्नदान करण्यात येणार आहे. तर लाईट स्पीकर सागर स्पीकर्स, शिरभावी जगदीश होवाळ यांच्याकडून तर विशेष सहकार्य मायाक्का प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष काशिलिंग (बाबू) गावडे यांचे मिळणार आहे. तर समालोचक म्हणून एम. आडसूळ व बापू लोकरे करणार आहेत. या स्पर्धेमध्ये क्रांतीसुर्य मोबाईल शॉपी सांगोला यांच्यावतीने शो मॅच साठी ३ हजार १ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे आयोजन दादा शिंदे, पांडुरंग ताटे, जगदीश होवाळ, तानाजी भोसले, समाधान मोरे, काकासाहेब चोरमुले व आनंदा भाऊ माने मित्र मंडळ सांगोला तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेमध्ये नियम व अटी लागू राहतील.अधिक माहितीसाठी दादा शिंदे – 9236565656 , पांडुरंग ताटे – 968955160 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments