google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कुटुंबातील जमीन नावावर करणे झाले सोपे पहा कसे.

Breaking News

कुटुंबातील जमीन नावावर करणे झाले सोपे पहा कसे.

 कुटुंबातील जमीन नावावर करणे झाले सोपे पहा कसे.


 कुटुंबातील जमिनींचे वाटप करताना कुटुंबातील सर्वांची सहमती  असल्यास आता केवळ अर्ज आणि कच्चा नकाशा दिल्यास हिश्याचे वाटप होणार आहे. त्यामुळे जमीन मोजणीपासून ते प्रत्यक्ष सातबारा उताऱ्यात नाव नोंदविण्यापर्यंतच्या किचकट  प्रक्रियेला फाटा देण्यात आला आहे. राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी याबाबतचा निर्णय घेतला असल्याने राज्यातील लाखो कुटुंबांतील पोटहिश्श्यांचे वाटप सोपे झाले आहे.


ही कागदपत्रे द्यावी लागणार

 पोटहिस्से करण्यासाठी सर्व सहधारकांची स्वाक्षरी असलेला अर्ज

 हा अर्ज 'ई मोजणी'द्वारे ऑनलाइन भरून घेतला जाणार

 एखाद्या सहधारकाची स्वाक्षरी नसल्यास पोटहिस्सा करता येणार नाही

 भूमापन क्रमांकातील सर्व उपविभागाचे चालू तीन महिन्यांतील सातबाराचे उतारे

 धारण जमिनीत कसे पोटविभाग करावयाचे आहेत, ते दर्शविणारा सर्व सहधारकांची स्वाक्षरी असलेला कच्चा नकाशा गाव नमुना क्रमांक ७/१२ वेगळा झाला असल्यास 'गाव नमुना नंबर ६ ड'मधील कच्चा नकाशा हा नकाशा उपलब्ध नसल्यास तलाठी यांच्याकडील प्रमाणपत्र जोडावे  या नकाशाप्रमाणे प्रत्येक भोगवटादार  यांच्या कब्जवहिवाटीत असलेले अंदाजित क्षेत्र व अधिकार अभिलेखात असलेल्या क्षेत्राचा तपशील द्यावा लागणार सामायिक क्षेत्रात विहीर, बोअरवेल, वस्ती, झाडे यांचा तपशील देणे आवश्यक भोगवटादार यांची ओळख पटविण्यासाठी फोटो ओळखपत्राची  स्वसाक्षांकित छायाप्रत देणे गरजेचे. त्यात आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पासपोर्ट व सरकारने दिलेले कोणतेही अधिकृत फोटो ओळखपत्र यांपैकी कोणतेही एक द्यावे लागणार

अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया

पोटहिश्शासाठी अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यात भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक यांच्याकडून अर्जदार आणि सहधारक यांना नोटिस देऊन कार्यवाही केली जाणार आहे.


कच्चा नकाशा आणि क्षेत्राचा तपशील सर्व सहधारक यांना मान्य असल्याबाबतचा जबाब घेण्यात येईल.जबाब घेताना अधिकारी आणि सर्व सहधारकांचा एकत्रित फोटो मोबाइल किंवा अन्य कॅमेऱ्याद्वारे घेतला जाऊन, त्याची नोंद ठेवण्यात येणार. एखाद्या प्रकरणात चौकशीची गरज भासल्यास अर्ज प्राप्त झाल्यानंतर एक महिन्यात प्रक्रिया पूर्ण केली जाणार. चौकशीची गरज नसल्यास सात दिवसांत कार्यवाही होणार. कुटुंबातील जमिनीची विभागणी करताना  नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी 'संमतीने अभिलेख पोटहिस्सा' या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे पोटहिस्सा विभागणी करण्याची प्रक्रिया  सोपी झाली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २० नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत.


- एस. चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त

प्रचलित किचकट पद्धती

प्रचलित पद्धतीनुसार गावाच्या नकाशात सर्व्हे नंबर, रस्ते, गावाची शीव, नद्या, नाले दाखविण्यात आलेले असतात. त्या मूळ रेकॉर्डमधील नकाशा आणि मोजमापे यांचा विचार करून जमीन मोजली जाते. एकत्रीकरण योजना राबविलेल्या गावांत सर्व्हे नंबरऐवजी गट नंबर असे संबोधण्यात आलेले असते. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर सर्व्हे नंबर  किंवा गट क्रमांक असतो. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. अर्ज आल्यावर मोजणी रजिस्टर क्रमांक दिला देण्यात येतो. त्यानंतर मूळ रेकॉर्डच्या आधारे उतारा तयार करून, तो सर्व्हेअरकडे देण्यात येतो. मोजणीपूर्वी सर्व्हेअर अर्ज करणाऱ्यांना आणि अर्जदाराच्या लगत असलेल्या कब्जेदारांना सुमारे १५ दिवस मोजणीआधी नोटीस पाठवितात. सर्व्हे नंबरचा दगड, बांधाचा दगड किंवा अन्य खुणांच्या आधारे जमिनीची मोजणी केली जाते. मोजणी झाल्यावर ती मोजणी संबंधितांना मान्य नसल्यास अपील करता येते. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील तालुका 

Post a Comment

0 Comments