google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महिलेला विवस्त्र करून जीवघेणा हल्ला -

Breaking News

महिलेला विवस्त्र करून जीवघेणा हल्ला -

 महिलेला विवस्त्र करून जीवघेणा हल्ला -


बारामती तालुक्‍यातील सोमेश्‍वरमधील महिलेला सैतानाचा अवतार आहे, असे म्हणत तिचा बळी द्या म्हणून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तात्या नावाच्या मांत्रिकाने अघोरी कृत्य करण्यासाठी महिलेला विवस्त्र करून सासू व दिरांनी लोखंडी पाइप व लाकडी दांडक्‍याने मारहाण केली.


आरोपी महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, सासू कौशल्या माणिकराव गायकवाड, ननंद नीता अनिल जाधव आणि अघोरी उपचार करणाऱ्या मांत्रिकावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे छोट्या-छोट्या कारणावरून जाणीवपूर्वक वाद घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. दीर महेंद्र यांनी तू सैतानाचा अवतार आहे, हीचा बळी द्या, असे म्हणत पीडित महिलेचा हाताने गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला. नरबळीच्या हेतूने तात्या नावाच्या मांत्रिकाने अघोरी कृत्य करण्यासाठी पीडित महिलेला विवस्त्र करून अघोरी कृत्य करण्यासाठी भाग पाडले. सासू कौशल्या, दीर महेंद्र यांनी मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पीडित महिला घाबरली. तिने बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अत्याचाराची कैफीयत मांडली.


पोलिसांनी आरोपींवर महानरबळी अधिमियम 2013 कलम 2(1) ख, भादंवी कलम 498 (अ),307,354,324,323, 504,506 (34) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहेत. महिलेला मारहाण करून अघोरी कृत्य करण्याचा प्रकार समोर येताच तो तात्या मांत्रिक कोण, याची परिसरामध्ये चर्चा रंगली आहे. त्याने अजूनपर्यंत असे किती जणांना अघोरी कृत्यात ओढून आपले सावज बनविले आहे. यात अनेक पीडितांची छळवणूक केली असल्याची शक्‍यता आहे. बारामती पोलिसांनी तात्या मांत्रिकांकडे कसून चौकशी केल्यास तात्याचे अनेक कारनामे उघडकीस येण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे.

Post a Comment

0 Comments