google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील सर्वच शाळा सुरू होणार ? शाळा सुरू होण्याचे शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

Breaking News

राज्यातील सर्वच शाळा सुरू होणार ? शाळा सुरू होण्याचे शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

 राज्यातील सर्वच शाळा सुरू होणार ?

शाळा सुरू होण्याचे शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत


मुख्यमंत्री, मंत्रीमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर राज्यातील पहिली ते चौथी पर्यंत च्या शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. वर्षा गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा,त्याअनुषंगाने तयारी,लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला.


राज्यातील इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असून पुन्हा शाळा सुरू करण्यावर जोर असल्याचे दिसत आहे. या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आता प्राथमिक शाळाही लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. या बैठकीत जवळपास सगळ्याच जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने ‘आदर्श शाळा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले.

Post a Comment

0 Comments