धक्कादायक प्रकार... व्हाट्सअप युट्युब इंस्टाग्राम वरून तरुणीला बदनाम करणारा .पंजाब मधील आरोपीस अटक सांगोला पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी..पोनि श्री सुहास जगताप
धक्कादायक प्रकार.. लूडो गेम खेळत असताना मैत्री करून युटयुब , इंस्टाग्राम मेसेज करून तरुणीला बदनाम करणारा पंजाब मधील आरोपीस अटक सांगोला पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी
कु . प्रगती भारत साठे रा . नरळेवाडी ता . सांगोला जि . सोलापुर हिस लुडो गेम खेळत असताना चॅट करून तिचा विश्वास संपादन करून तिचा मोबाईल नंबर घेवुन आरोपी नामे अमनदिप सिंग रा . पंजाब याने तिच्याशी मैत्री संपादन करून तो व्हॉटस अॅप , इंस्टाग्राम या सोशल मिडीयाव्दारे तिला व्हिडीओ कॉल करत असायचा व तो रेकॉर्ड करायचा आरोपी याने फिर्यादीस तु कपडे काडुन माझे समोर ये असा वारंवार तिला व्हीडीओ कॉलव्दारे बोलायचा ती पुर्ण कपडे काडत नसल्याने आरोपी हा बाथरूम मध्ये जावुन तिला व्हीडीओ कॉल करून त्याची पॅन्ट खाली करून अश्लिल व्हीडीओ तयार करू लागला व तयार केलेले
व्हीडीओ तो फिर्यादीचे नातेवाईक , युटयुब , इंस्टाग्राम व कॉलेज मधील ग्रुपवरती त्याने ते पाठवुन फिर्यादीची बदनामी केली आहे अशा सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . त्यानंतर सांगोला पोलीसांनी कौशल्याने तांत्रिक दृष्टया तपास करून सदर गुन्हयातील आरोपी नाम अमनदिप करम सिंग वय २३ वर्ष रा . लखना थापा ता . पट्टी जि . तरण तारण ,
पंजाब राज्य पंजाब या ठिकाणी जावुन त्याचा शोध घेवून त्यास सदर अटक करण्यात आली . सदर गुन्हयाचा तपास श्री तेजस्वी सातपुते मॅडम , पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण , श्री . हिंमतराव जाधव सो , अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण श्री राजश्री पाटील सो उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांच्या मार्गदर्शनाखाली
पोनि श्री सुहास जगताप साो , हे तपास करीत असुन सदर गुन्हयाचे तपासकामी पोसई / संदेश नाळे , पोहेकॉ / १५४७ वजाळे पोना / १६८२ अभिजीत मोहोळकर , पोना / १७ ९ ३ सुखदेव गंगणे , पोना / १४२५ बाबासाहेब पाटील सायबर पोलीस ठाणे कडील पोकॉ / अन्वर अतार यांनी मदत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे .

0 Comments