धावत्या रेल्वेत २० वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार
कल्याण : धावत्या ट्रेनमध्ये आठ दरोडेखोरांनी प्रवाशांची लुट करीत एका महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरी आणि कसारा दरम्यान घडली आहे. कल्याण जीआरपी पोलिसांनी याप्रकरणी दोन दरोडेखोरांना ताब्यात घेऊन इतर आरोपींचा शोध घेत आहे. या घटनेने धावत्या मेलमध्ये लूट आणि बलात्कारांची घटना घडल्याने रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. तसेच बलात्कारांच्या घटनेने राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. पुष्पक एक्सप्रेस शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना ट्रेनच्या बोगी नंबर डी टू मध्ये बसलेले आठ तरूणांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या दरोडेखोरांनी प्रवाशांकडील मोबाईल आणि पैसे हिसकावून घेतले. त्यांना प्रतिकार करीत असलेल्या प्रवाशांना मारहाण केली.
तसेच त्या दरोडेखोरांनी ट्रेनमध्ये असलेल्या एका महिला प्रवाशीसोबत छेडछाड सुरू केली. या महिलेवर बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरोडेखोरांकडे हातात फाइटर आणि बेल्ट असताना प्रवाशांनी दरोडेखोरांना पकडून ठेवले होते. कसारा स्थानक येताच प्रवाश्यांनी दोन दरोडेखोरांना कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिले. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे. मध्य रेल्वे डीसीपी मनोज पाटील म्हणाले, ही घटना समजल्यानंतर ती कुठे घडली हे न पाहता कल्याण जीआरमध्ये गुन्हा दाखल केला आहे. दरोडेखोरांपैकी सात जण हे नाशिक येथील घोटीचे असून एक मुंबईचा आहे. दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून इतरांचा शोध सुरू आहे.
0 Comments