अचकदाणी - महूद रस्ता तात्काळ दुरुस्त करावा ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्त्यावर रस्ता रोको : अनिल केदार
सांगोला प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या अनेक वर्षापासून रहदारीस अत्यंत दुरावस्था झालेला अचकदाणी ते महूद हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी काल बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने याच रस्त्यावर रस्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सार्वजनिक बांधकाम उप अभियंता अशोक मुलगीर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन येत्या महिन्याभरात पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला हा रस्ता दुरुस्त करून खड्डेमुक्त करू असे आश्वासन दिल्याने रस्ता रोको आंदोलन मागे घेतल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल केदार यांनी सांगितले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे, पोलीस नाईक आप्पासो पवार, पोलीस नाईक रामचंद्र जाधव उपस्थित होते. रस्ता रोको प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर, सांगोला विधासभा अध्यक्ष अक्षय विभुते ,तालुका संघटक विशाल गोडसे , मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोडसे, कृष्णदेव इंगोले, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बनसोडे, शहराध्यक्ष अजिंक्य तोडकरी, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष ओंकार शिंदे ,
सहकार सेना आर.टी सरगर ,मारुती ऐवळे, सागर हिप्परकर, कुंडलिक शिंदे, विनायक काळेल, तात्यासो कर्चे, सोमनाथ नरके, तेजस पुजारी, पंकज सावंत ,आप्पासो गंगनमले ,प्रसिद्धी प्रमुख खंडू इंगोले आदी मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्ता रोको आंदोलनास लोटेवाडीचे सरपंच विजयदादा खांडेकर , अचकदाणीचे सरपंच प्रतिनिधी, युवा नेते विजय पाटील यांनी पाठिंबा दिला होता.
0 Comments