google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लसीकरण कमी असलेल्या गावचे सरपंचपद धोक्यात तर होईल पद रद्द : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांचा इशारा

Breaking News

लसीकरण कमी असलेल्या गावचे सरपंचपद धोक्यात तर होईल पद रद्द : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांचा इशारा

 लसीकरण कमी असलेल्या गावचे सरपंचपद धोक्यात तर होईल पद रद्द : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांचा इशारा


सोलापूर : ज्या गावात लसीकरण कमी असेल त्या गावचे सरपंचपद रद्द करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे . लसीकरणाबाबत समन्वयक डॉ . अनिरुद्ध पिंपळे यांच्याकडून गुरुवारी सीईओ दिलीप स्वामी यांनी माहिती घेतली . बऱ्याच गावात संथगतीने लसीकरण सुरू आहे . जिल्हा आरोग्य विभागाकडे दोन लाख डोस शिल्लक आहेत . रात्री दहा वाजेपर्यंत आरोग्य केंद्र सुरू ठेवून लसीकरण केले जात आहे . 


त्याचबरोबर वाड्यावस्त्यांवरील लोकांना मोबाईल व्हॅनची सेवा दिली जात आहे . असे असतानाही बऱ्याच गावातील लोकांनी पहिला डोस घेतलेला नाही . या गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना नोटिसा काढण्याची सूचना सीईओ स्वामी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिली आहे . त्याचबरोबर आपत्कालीन कायद्यानुसार ज्या गावचे सरपंच साथरोग उपाययोजनेत हयगय करतील त्यांचे पद रद्द करण्याची तरतूद आहे .जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही लसीकरणाचा आढावा घेतला . सीईओ स्वामी यांनी आपत्कालीन कायद्यातील तरतुदीचा आधार घेत आता गावोगावचे लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले . त्यासाठी काम कमी करणाऱ्या सरपंचावर कारवाईचा प्रस्ताव सादर केला जाणार .असल्याचे सांगितले . त्यामुळे आता ज्या गावात लसीकरण कमी झालेले आहे त्या गावचे सरपंच व ग्रामसेवक प्रशासनाच्या रडारवर आले आहेत . ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने घरोघरी जाऊन लसीकरण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत .


२२ लाख जणांना डोस ग्रामीणमधील २७ लाख ३६ हजार ४ ९ २ जणांनी तर शहरातील २ लाख २० हजार ६०१ जणांनी पहिला डोस घेतला आहे . ६४.५ टक्के लसीकरण झाले आहे . तसेच ग्रामीणमधील ४ लाख ६० हजार ६०३ जणांनी तर शहरातील २१ हजार ३२ ९ अशा ६ लाख ७३ हजार ८२२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे . १ ९ .६ टक्के लसीकरण झाले आहे . केंद्रावर ३ हजार ८६० कोव्हिशिल्ड तर १५ हजार २० कोव्हेंक्सिनचे डोस शिल्लक आहेत .आधी लसीकरण मग दिवाळी पहिलाही डोस न घेतलेल्या लोकांसाठी आरोग्य विभागाने आधी लस मग दिवाळी अशी मोहीम हाती घेतली आहे . ज्या गावातील लोकांनी पहिला डोस घेतलेला नाही अशांच्या घरी आरोग्य कर्मचारी पोहोचणार आहेत . दिवाळीच्या आधी सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे .


Post a Comment

0 Comments