google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सिद्धेश्वर , हुतात्मासह सोळा एक्स्पेस आजपासून पुन्हा धावणार !

Breaking News

सिद्धेश्वर , हुतात्मासह सोळा एक्स्पेस आजपासून पुन्हा धावणार !

 सिद्धेश्वर , हुतात्मासह सोळा एक्स्पेस आजपासून पुन्हा धावणार !


सोलापूर : मध्य रेल्वेच्या  सोलापूर  विभागातील वाशिंबे ते भाळवणी या 26.33 किमीच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी 28 ऑक्‍टोबरपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र हे काम पूर्ण झाले असून, या मार्गावर विद्युत इंजिनची चाचणी गुरुवारी यशस्वी झाली आहे.त्यामुळे आजपासून हुतात्मा , सिद्धेश्वरसह  अन्य 16 गाड्या पुन्हा ट्रॅकवर येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-कुर्डुवाडी सेक्‍शनमधील भाळवणी ते वाशिंबे स्थानकादरम्यान 26.33 किमीचे दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मागील 14 दिवसांपासून हे काम युद्धपातळीवर करण्यात येत होते. मात्र28 ऑक्‍टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. या मार्गावरील दुहेरीकरण, विद्युतीकरण व इतर कामांची पाहणी देखील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून येथे केली आहे. हा मार्ग प्रवासासाठी योग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याच मार्गावरून गुरुवारी कोणार्क एक्‍सप्रेस सोलापूरच्या दिशेने धावली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मार्ग परिवर्तन करण्यात आलेल्या गाड्या पूर्वीच्या मार्गावरूनच धावणार आहेत. मात्र सध्या या गाड्या आपल्या निर्धारित मार्गावरूनच धावत आहेत. त्या लवकरच पूर्ववत होतील. त्यामुळे मार्ग परिवर्तन करण्यात आल्याने प्रवाशांचा वेळ जास्त लागत होता मात्र, सोलापूर विभागातील वाशिंबे ते भाळवणी दरम्यान दुहेरीकरणाचे काम झाल्याने याच मार्गावरून मेल, एक्‍सप्रेस गाड्या व मालगाड्या धावणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


या एक्‍सप्रेस गाड्या करण्यात आल्या पूर्ववत

मुंबई-गदग, गदग-मुंबई, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर, मुंबई-लातूर, लातूर-मुंबई, मुंबई-बिदर, बिदर-मुंबई, म्हैसूर-साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी-म्हैसूर, नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड हैदराबाद-हडपसर, बिदर-मुंबई, पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा या गाड्या 28 ऑक्‍टोबरपर्यत रद्द करण्यात आल्या होत्या. आता या गाड्या आजपासून (ता. 29) पूर्ववत करण्यात आल्यामुळे सोलापूरकरांची सोय झाली आहे.


मार्ग परिवर्तन (बदल) करण्यात आलेल्या एक्‍सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित स्थानकावरून धावतील

सांगोला-आर्दशनगर (दिल्ली) किसान रेल्वे, सांगोला-मुजफ्फरपूर किसान रेल्वे, सांगोला-शालिमार किसान रेल्वे, लोकमान्य टिळक टर्मिनस-मदुराई, मदुराई- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍सप्रेस, भुनेश्वर-पुणे एक्‍सप्रेस, पुणे-भुनेश्वर एक्‍सप्रेस, नागरकोईल-मुंबई एक्‍सप्रेस, मुंबई- नागरकोईल एक्‍सप्रेस, नागरकोईल-मुंबई एक्‍सप्रेस, मुंबई- नागरकोईल एक्‍सप्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्‍सप्रेस, एलटीटी-विशाखापट्टणम एक्‍सप्रेस, म्हैसूर-वाराणसी एक्‍सप्रेस, वाराणसी- म्हैसूर एक्‍सप्रेस


अहमदाबाद-चैन्नई एक्‍सप्रेस, चैन्नई-अहमदाबाद एक्‍सप्रेस, अहमदाबाद-चेन्नई एक्‍सप्रेस, चैन्नई-अहमदाबाद एक्‍सप्रेस, एलटीटी-करिकल एक्‍सप्रेस, करिकल-एलटीटी एक्‍सप्रेस, यंशवतपूर-अहमदाबाद एक्‍सप्रेस, अहमदाबाद- यशवंतपूर एक्‍सप्रेस, राजकोट-सिकंदराबाद एक्‍सप्रेस, सिकंदराबाद- राजकोट एक्‍सप्रेस, काकिनाडा-भावनगर एक्‍सप्रेस, भावनगर- काकिनाडा एक्‍सप्रेस, काकिनाडा पोर्ट-एलटीटी एक्‍सप्रेस, एलटीटी- काकिनाडा पोर्ट एक्‍सप्रेस, इंदोर- लिंगमपल्ली एक्‍सप्रेस, लिंगमपल्ली-इंदोर एक्‍सप्रेस, केवडिया-चेन्नई एक्‍सप्रेस, चैन्नई- केवडिया एक्‍सप्रेस, बंगळुरू-मुंबई उद्यान एक्‍सप्रेस, मुंबई- बेंगलुरू उद्यान एक्‍सप्रेस या गाड्या आपल्या निर्धारित स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.

वाशिंबे ते भाळवणी दरम्यान इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. हे काम पूर्ण झाले असून रद्द करण्यात आलेल्या गाड्या पूर्ववत करण्यात येत आहेत. तर मार्ग परिवर्तन केलेल्या गाड्यादेखील आपल्या पूर्वीच्या मार्गावरूनच धावणार आहेत.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

Post a Comment

0 Comments