आबासाहेब सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडून देशमुख कुटुंबियांचे सांत्वन
सांगोला (प्रतिनिधी) :महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरोगामी विचारसरणीचे अभ्यासू आणि पारदर्शक व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना ओळखले जात होते. त्यांनी विधानसभेत सातत्याने निवडून येण्याचा इतिहास घडविला. त्याचबरोबर त्यांच्यासमवेत आम्हाला काम करण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पक्ष कोणताही असो ते आम्हा सर्वांच्या दृष्टीने आदर्श असे व्यक्तिमत्व होते अशा भावना काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या.
महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी काल शनिवारी शेकापक्षाचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या सांगोला येथील निवासस्थानी सात्वंनपर भेट घेतली.
यावेळी ते बोलत होते. मंत्री ना थोरात यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुषहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी आमदार अमीन पटेल, माजी आमदार रामहरी रुपनवर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांतिक सदस्य प्रा. पी सी झपके, जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, उपाध्यक्ष राजन पाटील, श्रीमती रतनबाई देशमुख, चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील तालुकाध्यक्ष सुनील भोरे सर, शहराध्यक्ष तोहिद मुल्ला, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील नागणे, महिला माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिता गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष राजकुमार पवार, अँड महादेव कांबळे, रविप्रकाश साबळे, रविंद्र कांबळे, अभिषेक कांबळे, फिरोज मणेरी, तुषार माने, अमोल यादव युवराज पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना. बाळासाहेब थोरात म्हणाले, स्वर्गीय गणपतराव देशमुख महाराष्ट्रातील कष्टकरी शेतमजूर जनतेच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलताना सभागृहात त्यांचे भाषण शांतपणे ऐकून घेतले जात होते त्यांना प्रश्नाचे उत्तर देताना संबंधित खात्याचे मंत्री , अधिकारी यांना विचार करून द्यावे
लागत होते. त्यांचा हा विधानसभेतील सन्मान कायम स्मरणात राहील. अभ्यासू पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्तीमत्वाला आपण मुकलो आहोत. यावेळी जिल्हाध्यक्ष धवलसिंह यांनी काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे असे वक्तव्य केले आहे यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, त्यांनी धवलसिंह नवीनच जिल्हाध्यक्ष झाले आहेत, तरुण व धडाडीचे व्यक्तिमत्त्व असल्याने जोमाने कामास सुरुवात केली आहे राजकारणात परिस्थितीनुसार . निर्णय घ्यावे लागतात. राज्यघटना, पक्ष मत मतांतर हे असतातच जनहितासाठी व देशहितासाठी चांगले काम करायचे आहे. शेवटी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात असे बोलून त्यांनी डॉ. धवलसिंह यांच्या त्या वक्तव्यावर स्मित हास्य केले. याप्रसंगी प्रांताधिकारी समंदर, तहसीलदार अभिजीत पाटील शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments