नगरपालिकेच्या सर्व जागा बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढणार तालुकाध्यक्ष ॲड. सागर बनसोडे
सांगोला/प्रतिनिधी :येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात बहुजन समाज पार्टी सांगोला विधानसभा युनिटची बैठक तालुका अध्यक्ष ॲड. सागर बनसोडे यांच्या कार्यालयामध्ये काल 25 सप्टेंबर रोजी पार पडली.
बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड.संदीप ताजने साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व नगरपालीका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगोला बहुजन समाज पार्टीची आगामी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या चर्चेतून माननीय प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजणे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे येणारी नगरपालिका निवडणूक बहुजन समाज पार्टी स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याचे तालुका अध्यक्ष ॲड.सागर बनसोडे यांनी सांगितले. सांगोला शहर व शहरालगत असणाऱ्या वाड्या वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते तसेच नागरिकांच्याआरोग्याचा प्रश्न व शहरातील इतर विकासाशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी बहुजन समाज पार्टी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या सर्व जागा संपूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचेही तालुका अध्यक्ष ॲड.सागर बनसोडे यांनी सांगितले
यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे, माजी जिल्हा सचिव कुंदनजी बनसोडे, माजी विधानसभा महासचिव ॲड. आनंद बनसोडे, मीडिया प्रमुख शिरीष शिंदे, शहराध्यक्ष संदीप बनसोडे, शहर कोषाध्यक्ष अजीत बनसोडे , शहर बी व्ही एफ अण्णा काटे, विधानसभा कोषाध्यक्ष अविनाश सुर्यागण ,विधानसभा प्रभारी विश्वास मोरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments