मंगळवेढयाचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची बदली; अप्पासाहेब समिंदर नवे प्रांताधिकारी
कोण आहेत अप्पासाहेब समिंदर
मंगळवेढा येथील सिमोल्लंघनाचे रितसर निमंत्रण देण्यास गेलेल्या वरिष्ठ अधिकार्यांच्या समोर उद्धट वर्तन करून धार्मिक भावना दुखावाणाऱ्या तत्कालीन तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी झाल्या प्रकरणी प्रांत अधिकारी यांच्यासमोर माफी मागीतली होती. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला होता.एकविरा माळावरील सिमोलंघनाचा तहसीलदारांचा मान असल्याने याचे निमंत्रणाची तहसीलदारांच्या हातात पत्रिका दिली असता असल्या फालतू प्रथा बंद करा, मी कार्यक्रमाला येणार नाही. त्यावेळेस वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.
तरीही त्यांना न जुमानता आपला तोरा कायम ठेवत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे मंडळ अधिकार्याकडून पुजा उरकून घ्यावी लागली होती. तत्कालीन तहसिलदार अप्पासाहेब समिंदर यांनी 350 वर्षाच्या प्रथेला गालगोट लावून तमाम मंगळवेढेकरांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून त्यांना बडतर्फ करावे अन्यथा मंगळवेढेकरांसमवेत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सर्व पक्षीय कार्यकर्त्यानी दिला होता.भीमा नदीच्या पात्रातून ओव्हरलोड वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एंट्री न दिल्यामुळे केलेल्या कारवाईत आप्पासाहेब समींदर यांना दंड आकरण्यात आला होता.हा दंड भरताना हिशोबात अढलेल्या विसंगतीमुळे मंगळवेढयाचे तहसीलदार आप्पासाहेब समींदर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील कागष्ट येथील विजय भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती.
वाळू उपशातील कारवाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे यापूर्वीच्या तहसिलदारावर निलबंनाची कारवाई करण्यात आली असताना भोसले यांच्या तक्रारीमुळे मंगळवेढ्याचे तहसिलदार पुन्हा चर्चेत आले होते.
उदयसिंह भोसले यांच्या बदलीचे कारण
प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी मंगळवेढा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.166 भूसंपादनचे कामकाजात जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ केली तसेच मोबदला अदा करण्याच्या अनुषंगाने अनियमितता झाल्याने सदर महामार्ग पूर्ण होण्यास विलंब होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग 166 भूसंपादन त्या अनुषंगाने आदा करावयाच्या मोबदला बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे सव्वीस प्रकरणी गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी उप विभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकडून सहा महिन्यापूर्वी अहवाल खुलासा मागूनही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अद्याप खुलासा सादर केला नाही.ती वस्तुस्थिती विचारात घेता महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 च्या कलम 4(5) मधील तरतुदीनुसार उदयसिंह भोसले यांची सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या कारणास्तव त्यांच्या त्यांची बदली करण्यात येत असल्याचे आदेशात म्हंटले आहे.
राज्याच्या महसूल विभागाने राज्यातील 19 उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या केल्या त्यामध्ये सोलापूर महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे पंढरपूर प्रांताधिकारी म्हणून पदस्थापना मिळाली आहे तर अन्नधान्य वितरण अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांना मंगळवेढ्याचा प्रांत अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे तसेच पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना सांगली जिल्ह्यात महसूल उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे .विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची भंडारा निवासी उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे, मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची नियुक्ती उस्मानाबाद जिल्ह्यात विशेष भू संपादन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
त्याचबरोबर महसूल विभागाने राज्यातील 14 तहसीलदारांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांची बदली झाली आहे त्यांना सातारा या ठिकाणी स्थावर व्यवस्थापक राज्य शेती महामंडळ पदी नियुक्ती देण्यात आली आहे.सोलापुरातील करमणूक कर शाखेचे बाळासाहेब शिरसाट यांची अक्कलकोट तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे तहसीलदार प्रदीप शेलार यांची बदली अमरावती या ठिकाणी झाली असून त्यांच्या जागेवर पुणे येथून सोनाली मेटकरी या येत आहेत. मोहोळचे नायब तहसीलदार राजकुमार लिंबारे यांची पदोन्नती झाली असून ते तहसीलदार झाले आहेत. प्रशांत बेडसे यांची मोहोळच्या तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे.
0 Comments