google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर | नाहरकत प्रमाणपत्राला मोजावी लागणार दुप्पट रक्कम ; जिल्हा परिषद आरोग्य समितीचा ठराव

Breaking News

सोलापूर | नाहरकत प्रमाणपत्राला मोजावी लागणार दुप्पट रक्कम ; जिल्हा परिषद आरोग्य समितीचा ठराव

 सोलापूर | नाहरकत प्रमाणपत्राला मोजावी लागणार दुप्पट रक्कम ; जिल्हा परिषद आरोग्य समितीचा ठराव


जिल्ह्यात व्यवसाय उभा करणाऱ्या व्यावसायिकाला आरोग्य विभागाचे नाहरकत प्रमाण पत्र मिळविण्यासाठी रक्म दुप्पट करण्याचा ठराव आरोग्य समितीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात व्यवसाय उभा करणाऱ्या व्यावसायिकाला आरोग्य विभागाचे नाहरकत प्रमाण पत्र मिळविण्यासाठी रक्म दुप्पट करण्याचा ठराव आरोग्य समितीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. जि.प.सदस्य अरुण तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समिती घेण्यात आली. सभे दरम्यान सदस्य आण्णाराव बाराचारे यांनी व्यासयिकांच्या नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय फीमध्ये दुप्पटीने वाढ करण्याचा ठराव सभागृहा पुढे मांडला.पक्षनेते अणाराव बाराचारे, स्वाती कांबळे, शिलवंती भासगी, अतुल खरात, रेखा राऊत, नितीन नकाते सदस्य यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


सभेदरम्यान सर्वप्रथम सोलापूर जिल्हयातील कोविड-१९ साथजन्य परिस्थिती आटोक्यात आणल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव व त्यांचे टिमचे अभिनंदन करण्यात आले. सोलापूर जिल्हयामध्ये कोविड-१९ चे उत्कृष्ठरित्या व नियोजनबध्द पध्दतीने राबवून राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे लसीकरण पूर्ण केल्याबद्दल आरोग्य समितीच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, डॉ. अनिरुध्द पिंपळे RCH अधिकारी व त्यांच्या टीमचे जाहिर सत्कार करण्यात आले. अत्याधुनिक पध्दतीची रुग्णवाहिका स्वर्गीय राजूबापू पाटील माजी जि.प. सभापती यांच्या स्मरणार्थ जनतेच्या सेवेसाठी भोसे ग्रामस्थांच्या वतीने लोकार्पण करणार असल्याची माहिती अतुल खरात यांनी दिली. गाव, वाडया-वस्ती, तांडा इत्यादी ठिकाणी तेथे जाऊन गावनिहाय कोविड-१९ लसीकरण करण्यात यावे, अशा सूचना सदस्यांनी मांडल्या.

Post a Comment

0 Comments