google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; राजश्री पाटील यांची धडाकेबाज कारवाई

Breaking News

मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; राजश्री पाटील यांची धडाकेबाज कारवाई

 मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; राजश्री पाटील यांची धडाकेबाज कारवाई 


मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी गावचे शिवारात लिंबाच्या झाडाखाली मन्ना नावाचा जुगार पैशावर लावून तो खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ५१ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , मंगळवेढयाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांना शिरनांदगी येथे मन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती प्राप्त होताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने दि.३० रोजी ३.३० वा.माळवाडी नं.२ मधील भिमराव चौगुले यांच्या घराच्या बाजूस लिंबाच्या झाडाखाली खेळणाऱ्या ठिकाणी छापा टाकला.यावेळी पोलिसांना रोख रक्कम, मोबाईल असा एकूण ५१ हजार ९ ५० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.


या प्रकरणी पोलिसांनी राजू गजराम सुतार, प्रकाश भिवाजी किसवे, रेवणसिध्द बबन खांडेकर, पप्पू गजराम कांबळे, संजय बलभिम पाटील, अंकुश बलभिम पाटील (रा.शिरनांदगी), पंडित नागप्पा कांबळे , अर्जुन सिद्राम हालेकर ( रा.निंबोणी ) यांना पोलिसांनी कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.सचिन पांडुरंग कोळेकर हा पोलिसांना पाहून घराच्या आडोशाने पळून जाण्यास यशस्वी झाला आहे. याची फिर्याद पोलिस शिपाई मनोहर भोसले यांनी दिली असून वरील ९ जणांविरूध्द जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान शहर व ग्रामीण भागात झाडाखाली, मंदिरामध्ये बसून टाईमपासच्या नावाखाली मन्ना जुगार खेळला जात असल्याचे चित्र आहे

. या ठिकाणावरही आता पोलिसांनी कारवाईसाठी करडी नजर ठेवली आहे.

Post a Comment

0 Comments