google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 योजनेत सहभागी व्हा अन् लाखोंची बक्षिसे मिळवा, पशुपालकांसाठी सुवर्ण संधी

Breaking News

योजनेत सहभागी व्हा अन् लाखोंची बक्षिसे मिळवा, पशुपालकांसाठी सुवर्ण संधी

 योजनेत सहभागी व्हा अन् लाखोंची बक्षिसे मिळवा, पशुपालकांसाठी सुवर्ण संधी


शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसयाची ओळख आहे. त्याच अनुशंगाने पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणात व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारच्यावतीने राष्ट्रीय गोकूळ अभियान राबवले जात आहे. 15 सप्टेंबर ही सहभागी होण्याची शेवटचा तारिख आहे. त्यामुळे योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना आजच अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.पशुसंवर्धन वाढविण्याच्या दृष्टाने केंद्रसरकारचे प्रयत्न हे सुरु आहेत. त्या अनुशंगाने गोकुळ मिशन योजना ही राबवली जात असून यामध्ये सहभाग नोंदवणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जातात. प्रथम क्रमांकास 5 लाख, द्वितीय क्रमांकास 3 लाख तर तृतीय क्रमांकास दोन लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा एक मानाचा पुरस्कार असून दरवर्षी याचे वितरण हे केले जाते.


अशा पध्दतीचा आहे हा पुरस्कार राज्यातील केवळ दुग्ध उत्पादकांना हा पुरस्कार दिला जातो. कृत्रिम गर्भधारणा आणि दुग्ध उत्पादकाच्या 50 जातीच्या गाई किंवा दुध उत्पादक कंपनीने प्रमाणित केलेल्या 17 गाईंचे संगोपन करुन हा पुरस्कार प्रदान केला जातो. कृत्रिम गर्भधारणा या पुरस्काराठी अर्जदाराने कमीत-कमी 90 दिवसाचे प्रशिक्षण घेतलेल असावे तरच यामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. राज्य पशुधन विकास मंडळ, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञ हे पुरस्कार प्राप्त करण्यास पात्र असणार आहेत. याशिवाय दूध उत्पादन क्षेत्रातील 50 शेतकरी आणि दररोज 100 लिटर दुध उत्पादक सहकारी संस्था आणि दुध उत्पादक कंपन्या ज्या सहकारी कायद्याअंतर्गत गाव पातळीवर कार्यरत आहेत. अशा संस्थांनाच हा पुरस्कार प्रदान केला जातो.


तीन श्रेणींमध्ये पुरस्काराचे होणार वितरण

गोरत्न पुरस्कार योजनेअंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय या तीन श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहे. देशी गायींचे संगोपन करणारे दुग्ध उत्पादक, कृत्रिम गर्भधारणा करणारे तंत्रज्ञ, दुग्ध सहकारी किंवा दुग्ध उत्पादक कंपनी तसेच दुग्ध उत्पादक शेतकरी हे या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात. प्रथम पारितोषिक हे पाच लाख रुपये, द्वितीय पारितोषिक हे तीन लाख तर तृतीय क्रमांकास दोन लाख रुपये दिले जाणार आहेत

असा करा अर्ज

गोपाल रत्न पुरस्कार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.15 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. कोणताही शेतकरी, तंत्रज्ञ जो यासाठी पात्र आहे तो आता ऑनलाईन अर्ज करू शकतो. या योजनेसाठी केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.याशिवाय शेतकरी www.dahd.nic.in या लिंकवर जाऊन अर्ज करू शकतात. याशिवाय मंत्रालयाच्या टोल फ्री नंबर 011-23383479 वर कॉल करून माहिती मिळवू शकता.

Post a Comment

0 Comments