काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजपाची माघार; राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार
मुंबई : राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसच्या विनंतीला भाजपने मान दिला आहे. संजय उपाध्याय आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. काँग्रेसचा नेत्या रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मागच्या आठवड्यात राज्यातील काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
काँग्रेसने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन लोटांगण घातल्यामुळे महाविकास आघाडीतील इतर नेते नाराज झाल्याची चर्चा होती. निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर त्या बदल्यात १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची देवेंद्र फडणवीसांनी मागणी केल्याची चर्चा होती.
मावळ : लोणावळा नगरपरिषदेची निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली तसतशी येथील राजकीय स्थिती तापू लागले आहेत. सुरुवातीला नगरपरिषद निवडणुका एक वॉर्ड पद्घतीने होणार होत्या, त्यामुळे अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत नगरपरिषद लढण्याची तयारी सुरु केली होती. मात्र दोन दिवसापुर्वी नगरपरिषद निवडणुका वॉर्डनिहाय न होता बहुसदस्यीय प्रभाग पद्घतीने घेण्याचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढल्याने अनेक इच्छुकांचे धाबे दणाणले असून काही जणांनी आपल्या तलवारी म्यान केल्याचे बोलून दाखवले आहे. एक वॉर्ड पद्घतीने होणार्या निवडणुकांसाठी मतदार संख्या मर्यादित असते, तसेच हक्काची मते, मनी व मसल पॉवरच्या जीवावर त्या सहज जिंकता येतात, याकरिता काही मंडळींनी तयारी करत फ्लेक्सबाजी, सकाळचे गुड मॉर्निंगचे मेसेज, सुविचार मेसेज पाठवत आपण कसे योग्य उमेदवार आहोत, आपले विचार किती चांगले आहेत याची भुरळ मतदारांवर पाडण्यास सुरुवात केली होती. नागरी समस्यांवर पाच वर्ष मनातल्या मनात देखील ज्यांनी ब्र काढला नाही ते आता शहराच्या विकासासाठी मी कसा योग्य आहे, मला कोणा कोणाचा पाठिंबा आहे हे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्घतीमुळे चांगले उमेदवार व पक्षीय उमेदवार निवडून येण्यास मदत होणार आहे.
लोणावळा नगरपरिषदेची मागील पंचवार्षिक निवडणूक ही देखील बहुसदस्यीय पद्घतीने झाली होती. त्यावेळी 2011 ची लोकसंख्या विचारात घेत शहराचे 25 वॉर्ड (12 प्रभाग) तयार करण्यात आले होते. यावर्षी देखील तोच फाॅर्म्युला असणार आहे. 2021 ची जनगणना कोरोनामुळे न झाल्याने 2011 च्या लोकसंख्येनुसारच वाॅर्ड (प्रभाग) असतील. यामध्ये केवळ नविन मतदार जोडले जाणार आहेत. प्रभागरचनेत काहीसा बदल करून कायम करण्यात येतील.
बहुसदस्यीय प्रभाग पद्घतीमध्ये विकास कामांना महत्व देणार्या उमेदवाराला नागरिकांचा पाठिंबा राहतो हा इतिहास आहे. येथे मनी व मसल पाॅवर पेक्षा तुमचे काम फार महत्वाचे असते. सत्ताधारी गटाचा जो लोकप्रतिनिधी प्रभागाच्या व शहराच्या विकासाला पाठिंबा देत नागरिकांचे प्रश्न सोडवितो त्याला तसेच ज्या विरोधकांनी (लोकप्रतिनिधी/पक्ष नेते) नागरी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करून नागरिकांना न्याय मिळवून दिला अशाच उमेदवारांना मतदार पुन्हा पसंती देतात. दोन सदस्यीय प्रभाग रचनेत साधारणतः साडेतीन ते चार हजार मतदार असतात. ऐवढ्या मोठ्या प्रभागात ज्यांचे काम आहे व ज्यांनी नागरी समस्यांवर काम केले आहे, अशाच चांगल्या उमेदवारांना चांगले दिवस असणार आहेत. यामुळे बहुसदस्यीय प्रभागाची घोषणा होताच अनेक स्वंयघोषीत इच्छुकांनी एक पाऊल मागे घेतले आहे. तर काहीनी वेट अँन्ड वाॅचची भुमिका घेतली आहे.लोणावळा शहरात सध्या भाजप, काँग्रेस व आरपीआय अशी सत्ता असून शिवसेना विरोधात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा लोणावळा नगरपरिषदेत एकही सदस्य नाही. पक्ष पातळीवर लोणावळा शहर भाजपामध्ये दोन गट आहेत. तर महाविकास आघाडीत तिघाडी असल्याने राजकीय समीकरणं कशी ठरतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
0 Comments