google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रभाग क्र. 4 इंदिरानगर येथे नगरोत्थान निधी व नगराध्यक्षा यांच्या 15% निधीतून विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

Breaking News

प्रभाग क्र. 4 इंदिरानगर येथे नगरोत्थान निधी व नगराध्यक्षा यांच्या 15% निधीतून विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

 प्रभाग क्र. 4 इंदिरानगर येथे नगरोत्थान निधी व नगराध्यक्षा यांच्या 15% निधीतून विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न 


सांगोला (प्रतिनिधी) : प्रभाग क्र. 4 इंदिरानगर येथील नगरोत्थान निधी व नगराध्यक्षा यांच्या 15% निधीतून विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये नगरोत्थान मधून इंदिरानगर झोपडपट्टी मधील अंतर्गत गटारी करणे- रक्कम रु. 14 लाख 91 हजार 982 रु, इंदिरानगर भिवा भोसले ते बागवान घर रस्त्याच्या बाजूस पेव्हिंग ब्लॉक टाकणे- रक्कम रु. 6 लाख 97 हजार 681 रु. तसेच नगराध्यक्षा यांच्या 15% निधीमधून इंदिरानगर येथे अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे- रक्कम रु. 1 लाख 69 हजार 314 रु, इंदिरानगर तय्यब बागवान यांच्या घरासमोर आरसीसी गटार व पेव्हिंग ब्लॉक टाकणे- रक्कम रु. 1 लाख 33 हजार 358 रु, या कामाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या हस्ते करण्यात आले.



यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, गटनेते/नगरसेवक आनंदा माने, नगरसेवक अस्मिरभाई तांबोळी, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, मा. नगरसेवक माऊली तेली, सुरेश टेळे, हणमंत साठे, आशपाक मुलाणी, राजू उकिरडे, अमर बाबर, लतीफ मुलाणी, सुरज शिंदे, मनोज कांबळे, साधना पवार, अर्चना उंडाळे, रेणुका कांबळे, कविता साठे, शरीफ मणेरी, रियाज बागवान, बाळासाहेब मोहिते, अक्षय मोहिते, बिरुदेव खांडेकर यांच्यासह तेथील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments