निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख यांची सामाजिक क्षेत्रात अजून एक भरारी
लहानपणापासून समाजाची सेवा करण्याची आवड व आपल्या धारदार लेखनीने व पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य , तळागाळातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे ,कमी कालावधीतच गरुडझेप घेणाऱ्या सीबीएस न्युज नेटवर्क चे संपादक व निर्भीड पत्रकार चाँदभैया शेख यांची आता सामाजिक क्षेत्रात अजून एक भरारी घेतली आहे ती म्हणजे कामगार कर्मचारी संघर्ष युनियन सोशल मीडिया च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली आहे .
राष्ट्रीय पातळीवर कामगार व कर्मचारांच्या न्याय हक्कासाठी सडेतोड पणे लढा देत असलेल्या कामगार कर्मचारी संघर्ष युनियन सोशल मिडियाच्या नुकत्याच निवडी जाहीर करण्यात आल्या . यामध्ये सांगोला तालुक्यातील सामाजिक नेते व निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चाँदभैय्या शेख यांनी शेतकरी कष्टकरी ,कामगार कर्मचारांच्या प्रश्नांना निर्भीडपणे बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे .तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनेत कामे केले आहेत .यांचाच विचार करून कामगार कर्मचारी संघर्ष युनियन चे अध्यक्ष व काँग्रेस जेष्ठ नेते संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष आकाश गवळी साहेब व उपाध्यक्ष सतिशभाऊ मोटे नेतृत्वाखाली नियुक्ती पत्र देण्यात आले आहे .
चाँदभैय्या शेख हे चळवळीतील कार्यकर्ते, निर्भीड, पत्रकार, मनमिळाऊ स्वभावचे असल्याने त्यांचा दांडगा संपर्क आहे.शेतकऱ्यांच्या अडीअडचणी राष्ट्रीय किसान ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडविण्यासाठी ते कार्य करीत आहेत . तसेच कामगार कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना एकजूट करून सतत काम करीत आले आहेत . ग्रामीण भागातील सर्वसामान्य भेडसावणाऱ्या समस्या जनसामान्यांचे न्यायीक विषय सरकार दरबारी मांडणे हे त्यांचे कार्य पाहून नियुक्ती करण्यात आली आहे विशेषतः.राज्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा विषयांचे बातमीपत्र गाजले आहेत. ते सीबीएस न्युज मराठी चे मुख्य संपादक आहेत .आणि त्यांच्या निर्भीड बातम्यांची दखल शासन दरबारी कायम घेतली जात आहे .


0 Comments