google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सर्दी , खोकल्यासारख्या साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त कोरोना तर झाला नसावा ना ? अशी नागरिकांमध्ये भीती

Breaking News

सर्दी , खोकल्यासारख्या साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त कोरोना तर झाला नसावा ना ? अशी नागरिकांमध्ये भीती

 सर्दी , खोकल्यासारख्या साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त कोरोना तर झाला नसावा ना ? अशी नागरिकांमध्ये भीती


सांगोला / प्रतिनिधी सांगोला शहरासह तालुक्यात कोरोनामुळे नागरिक दहशतीत असताना , वातावरणातील बदलामुळेही आरोग्यावर परिणाम होत आहे . मागील काही दिवसांपासून तालुक्यात खोकला , ताप , साथीच्या आजाराच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे . हवामान बदलाचे परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत असून सर्दी , खोकल्याचे रुग्ण वाढताना दिसत आहे . त्यामुळे आपणाला कोरोना तर झाला नसावा ना ? अशी भीती प्रत्येकांच्या मनात घर करीत आहे . या साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत .


 शहरासह ग्रामीण भागातील दवाखाने रुग्णांनी भरले जात आहेत . कोरोनाची सर्वत्र दहशत असल्यामुळे सध्या साथीचे आजार आणि कोरोनाची लक्षणे एकच असल्याने अनेकांना आपण बाधित तर झालो नाही ना , असा प्रश्न पडत आहे . यावर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे .हवामान बदलामुळे आजार वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे . नागरिकांनी अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे . कधी थंडी , तर कधी उकाडा अशा हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिक बेजार झाले आहेत . हवामानातील या बदलामुळे सर्दी - खोकला , ताप , अंगदुखी ,डोकेदुखी आदी आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली असून , त्याचा सगळ्यात मोठा फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे . रात्री व पहाटे कडाक्याची थंडी , तर दुपारी उष्णता असे विषम वातावरण आहे . हवामानातील या बदलामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून खासगी दवाखान्यात रुग्णांची रीघ लागलेली पाहावयास मिळत आहे . 


त्यामध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे . हवामानातील हे बदल उपरोक्त आजारांना कारणीभूत ठरत असून प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लहान मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना याची लागण पटकन होते , असे डॉक्टरांचे म्हणणे आहे . खासगी दवाखान्यांमध्ये सर्दी खोकला , अंगदुखी अशा अनेक आजारांनी ग्रासलेल्यांची रांग लागली आहे . हवामान बदलामुळे साथीचा ताप येण्याचे प्रमाण वाढले असून अंगदुखी , डोकेदुखी , सर्दी - खोकला , घसा खवखवणे अशा तक्रारींतही वाढ झाली आहे . कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्यांना या बदलाशी पटकन जुळवून घेता येत नाही . परिणामी आजार बळावले आहेत . कोरोनाची भीती असताना , साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत .

Post a Comment

0 Comments