google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू सांगोला

Breaking News

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू सांगोला

 अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू


 सांगोला / प्रतिनिधी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला . ही घटना वाटंबरे ( ता . सांगोला ) येथे ३ ऑगस्ट रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली . चंद्रकांत निवृत्ती लांडगे ( वय ५४ , रा . शिवाजीनगर वासुद रोड , सांगोला ) असे अपघातात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे . याबाबत मिळालेली माहिती अशी , चंद्रकांत लांडगे हे तहसील कार्यालयासमोर टाईपरायटर म्हणून काम करतात . त्यांना १५ वर्षांपासून फिट येऊन चक्कर येण्याचा त्रास आहे . ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ते घराबाहेर पडले होते . रात्री उशिरा झाला तरी घरी न आल्याने पत्नी सुजाता यांनी नेहमीप्रमाणे त्रास झाला असेल म्हणून नातेवाईकांकडे व इतरत्र पतीचा शोध घेतला ; परंतु ते मिळून आले नाहीत . दरम्यान , दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पत्नी सुजाता यांना पतीचे मित्र राजू साळुखे यांचा फोन आला की , तुमच्या पतीचा रात्री २ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे आणले आहे . पत्नी सुजाता यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता डॉक्टरांनी चंद्रकांत लांडगे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले . याबाबत पत्नी सुजाता लांडगे यांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे .

Post a Comment

0 Comments