कुंभकर्णासारखी जनता झोपली आहे ; मी एकटा काय करणार ; अण्णांणीची हतबलता
आता कोठे गेले अण्णा , झोपले की काय ? असा सवाल अधूनमधून सोशल मिडीयातून केला जातो ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन करावे , अशी अपेक्षा ठेवून हा प्रश्न केला जातो तर अनेकदा त्यामागे राजकीय टीकाही असते . अशा परिस्थितीत आण्णा हजारे यांनीही जनतेवरच झोपल्याचा आरोप केला आहे . जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे , त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे . जनता जागी झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत.
असे आणांणी म्हटले आहे . आपण मात्र जागेच असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले . देश बचाव जनआंदोलन समितीने गेल्या आठवड्यात पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या विविध प्रश्नांवर हजारे यांनी भूमिका मांडावी आंदोलनासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती . , अन्यथा राळेगणसिध्दी येथे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता . त्यामुळे हजारे पदाधिकाऱ्यांनी राळेगणसिध्दीत येऊन हजारे यांची भेट घेतली . त्यांच्याशी चर्चा करताना आण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.आण्णा म्हणाले , माझे वय आता ८४ वर्षे आहे मी कधीपर्यंत लढू ?
देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो . तुम्ही लढा उभा करा , मी तुमच्यासोबत अवश्य येईल . . . आतापर्यंत आपण आंदोलने करून लोकहिताचे कायदे मंजूर करून घेतले . मात्र , आता सरकार वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करत आहे . मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहेत . जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे . त्यामुळे सरकारलाही हे करणे शक्य होत आहे जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे , तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द केले जातील असेही आण्णा म्हणाले यावर कार्यकर्त्यांनी हजारे यांना पूर्वीच्या आंदोलनांची आठवण करून दिली .
तुमच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे . तुम्ही दिल्लीला हलवू शकता त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो आहोत असे कार्यकर्ते हजारे यांना म्हणाले त्यावर हजारे म्हणाले . शेतकरी कायदे . वाढती महागाई बेरोजगारी या विरुध्द लढा देण्यासाठी तुम्ही संघटन उभे करा . मला जेव्हा वाटेल तुम्ही योग्य मार्गाने जात आहात तेव्हा मी तुमच्या आंदोलनात आवश्य सहभागी होईल . मी जागा आहे , मी काही झोपलेलो नाही . दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क केला नाही . तसेच शेतकरी प्रश्नी पाच वर्षांपासून आपण पाठपुरावा करीतच आहोत केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनीही आपल्याला कृषी कायद्यासंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमण्याचा शब्द दिला आहे . कोरोनामुळे समिती स्थापन झाली नाही . तरीही आपण पाठपुरावा करत आहोत असेही आण्णा यांनी पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले .


0 Comments