google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात आजपासून १० दिवसांचा कडक लॉकडाऊन - उदयसिंह भोसले

Breaking News

सांगोला तालुक्यात आजपासून १० दिवसांचा कडक लॉकडाऊन - उदयसिंह भोसले

 सांगोला तालुक्यात आजपासून १० दिवसांचा कडक लॉकडाऊन - उदयसिंह भोसले


सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आज १३ ऑगस्टपासून सांगोला तालुक्यात पुढील १० दिवस कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे . अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार असून या काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे .

 तसेच लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी बैठकित दिला . कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगोला तालुक्यात १३ ऑगस्ट पासून कडकडीत लॉकडाऊन करण्याचे निर्देश दिले आहेत . त्याअनुषंगाने प्रशासन व व्यापाऱ्यांची विचारविनिमय बैठक गुरुवार १२ ऑगस्ट रोजी पार पडली

 या बैठकीला प्रांताधिकारी उदयसिंह भोसले तहसीलदार अभिजित पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्रे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह व्यापारी उपस्थित होते . यावेळी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी . , ,सांगोला तालुक्यात दररोज ५० पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने ही बाब चिंताजनक असल्याचे सांगितले . यामुळे नागरिक , व्यापाऱ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार निर्बंध पाळावेत . कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १३ ऑगस्ट पासून पुढील दहा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे 

 कोरोना बाधित रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे . यासाठी नागरिक , व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे गेल्या महिन्यापासून दररोज रुग्णसंख्या वाढत असून रुग्णसंख्या वाढ चिंताजनक आहे . लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने अर्धवट उघडी ठेवू नयेत . तसेच दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे . प्रत्येक विभागाच्या टीम तैनात कराव्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिक , व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले . . .

Post a Comment

0 Comments