google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 उदरनिर्वाहासाठी आलेल्या परप्रांतीयांकडून वाढत्या तक्रारी चिंताजनक ; पोलीस व नागरिकांच्या निष्काळजीपणा मुळे गुन्हेगारी वाढली ?

Breaking News

उदरनिर्वाहासाठी आलेल्या परप्रांतीयांकडून वाढत्या तक्रारी चिंताजनक ; पोलीस व नागरिकांच्या निष्काळजीपणा मुळे गुन्हेगारी वाढली ?

 उदरनिर्वाहासाठी आलेल्या परप्रांतीयांकडून वाढत्या तक्रारी चिंताजनक ; पोलीस व नागरिकांच्या निष्काळजीपणा मुळे गुन्हेगारी वाढली ?


सांगोला / प्रतिनिधी ; सांगोला तालुक्यात असलेल्या काही परप्रांतीय कारागिराकडून घरातील ठेवलेले पैसे व सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या घटना घडत आहेत . तसेच अनेकदा मारामारीच्या घटना घडल्या असल्याने सांगोला तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे . सांगोला तालुक्यामध्ये फर्निचर , बांधकाम , डाळिंब मजर / व्यापारी , हॉटेलमध्ये काम करणारे कामगार , आचारी यांची संख्या तालुक्यात दहा हजारहून अधिक असल्याची शक्यता आहे . 


तालुक्यामध्ये हे परप्रांतीय कारागीर , व्यापारी , व बांधकाम व्यावसायिक भाड्याच्या खोल्या करून राहतात तसेच अनेक कारागीर ग्रामीण भागांमध्ये राहतात हे लोक घरातील फर्निचर घराचे बांधकाम व हॉटेलमध्ये आचारी , वेटर ही कामे करतात ज्या घरात राहतात किंवा ज्या ठिकाणी काम करतात त्या व्यक्तीचा विश्वास निर्माण करतात व घरातील किंमती वस्तू कोठे ठेवतात याकडे बारकाईने लक्ष ठेवतात व घरात कोणी नाही यावर लक्ष ठेवतात व वेळ मिळाल्यास घरातील सोन्या - चांदीची दागिने रोख रक्कमेसह पळवून नेतात अशीच घटना गेल्या आठ दिवसापूर्वी सांगोला शहरातील नवीन वसाहतीमध्ये घडली आहे .


अशा घटना वारंवार घडत आहेत व हे चोरी केलेले परप्रांतीय रातोरात गायब होतात यामुळे यांना कोठे शोधायचे हा मोठा संशोधनाचा विषय होतो तालुक्यातील रहिवाशांनी आपले घर भाड्याने देताना तसेच घरातील फर्निचर बांधकाम ही कामे देताना या परप्रांतीय कडून ओळख पत्रे घेणे आवश्यक असताना किंवा घर भाड्याने देत असताना त्यांचे कडून रीतसर भाडेकरार करुन देणे आवश्यक असते . किंवा या परप्रांतीय नागरिकांची पोलीस ठाण्यात नोंद करणे आवश्यक असते.परंतु या पैकी कोणत्याही कायदेशीर बाबींचा अवलंब न करता त्यांना कोमे घर दिले जाते . त्यामुळे सांगोला तालुक्यात या परप्रांतीयांकडून गुन्हेगारी वाढत आहे .

सांगोला तालुक्यातील कडलास येथे किराणा दुकान व घराचा कडीकोयंडा तोडून चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत या चोऱ्यामुळे ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे तालुक्यातील वाढत्या चोऱ्याचा तपास पोलीसांनी लावावा चोरीच्या घटनांची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्या जनतेमधून होत आहे .


Post a Comment

0 Comments