google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुणे जिल्ह्यातील त्या गावात पत्नीचे रक्षाबंधन बेतले पतीच्या जिवावर

Breaking News

पुणे जिल्ह्यातील त्या गावात पत्नीचे रक्षाबंधन बेतले पतीच्या जिवावर

 पुणे जिल्ह्यातील त्या गावात पत्नीचे रक्षाबंधन बेतले पतीच्या जिवावर 


पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे . रक्षाबंधनासाठी आपल्या पत्नीला घेऊन माहेरी गेलेल्या एका पतीसोबत एक भयानक घटना घडली आहे . प्रेमात अडसर ठरत असल्यामुळे पत्नीच्या जुन्या प्रियकारानं या पतीचा निघृण खून केला आहे . याबाबत माहित समजताच पोलिसांनी अवघ्या २४ तासात आरोपीचा छडा लावला आहे . मुख्य आरोपीसह त्याच्या चुलत भावाला ताब्यात घेण्यात आलं आहे . 


कोर्टाने त्यांना ६ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली . आहे या धक्कादायक घटनेबाबत अधिक माहिती पुढीलप्रमाणे महेश दत्तात्रय चव्हाण असं खून झालेल्यापतीचे नाव आहे . महेश हे रक्षाबंधनानिमित्त आपल्या पत्नीला घेऊन सासरवाडीला अकोले येथे आले होते.परंतु , रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी ( दि . २३ ऑगस्ट ) रोजी महेश यांची भालदवाडी अकोले गावच्या शेतात धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केली.ही घटना उघडकीस येताच भिगवन पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र , ही हत्या नेमकी कोणी केली याबाबत माहिती अस्पष्ट होती.मात्र , पोलिसांनी स्थानिक सूत्राच्या साहाय्याने तपास घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत . मयत महेश यांच्या पत्नीचं माहेरी घराशेजारी राहणाऱ्या अनिकेत शिंदे नावाच्या तरुणा बरोबर प्रेमसंबंध होते , याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.याद्वारे पोलिसांनी अनिकेतला ताब्यात घेतलं . यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता , 


त्यानं उडवा उडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली.पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी कबुल झाला.अनिकेतनं मृत महेश यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती दिली . तसेच महेशमुळे प्रेयसीला भेटता येत नव्हतं.त्यामुळे महेशबाबत अनिकेतच्या मनात प्रचंड राग होता . दरम्यान महेश सासरवाडीला येणार असल्याची माहिती मिळाली.या आलेल्या संधीचा फायदा घेत आरोपीने आपला चुलत भाऊ गणेश शिंदे याच्या मदतीनं महेशचं जीवन संपवलं.पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत .

Post a Comment

0 Comments