google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गौरी - गणपतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथ संचलन

Breaking News

गौरी - गणपतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथ संचलन

 गौरी - गणपतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथ संचलन


सांगोला / प्रतिनिधी आगामी गौरी - गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शहरातील प्रमुख मार्गावरून पथ संचलन ( रूट मार्च ) करण्यात आले . पथ संचलनामध्ये सांगोला पोलीस स्टेशनचे ५ पोलीस अधिकारी व २५ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते . यामध्ये दोन वाहनांचा समावेश होता . गणेशोत्सव सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये , यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे दाखवून देत , प्रमुख चौक व मार्गावरून पथ संचलन केले . शहरातील पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालयापासून बाजार पेठ ,अण्णाभाऊ साठे चौक , भीमनगर , छत्रपती शिवाजी महाराज चौक , धनगर गल्लीमधून पोलिसांनी पथ संचलन केले . गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व समाजकंटकांवर जरब निर्माण करण्याच्या दृष्टीने हे पथ संचलन करण्यात आले .

Post a Comment

0 Comments