google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न

Breaking News

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ सांगोला यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली याप्रसंगी सांगोला पोलीस स्टेशनचे पी आय सुहास जगताप साहेब एपीआय नागेश यमगर साहेब मंडळाचे अध्यक्ष दामू अण्णा साठे ज्येष्ठ नेते विचारवंत बापूसाहेब ठोकळे विनोद रणदिवे बेबीताई साठे ज्येष्ठ पत्रकार संतोष साठे लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब रणदिवे श्री बाळू रणदिवे भिवा भोसले सुरज रणदिवे अमित साठे कुलदीप रणदिवे विज्ञान महाविद्यालय प्रा श्री दीपक रिटे सर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त करताना आंबेडकरी विचारवंत बापूसाहेब ठोकळे यांनी आपले विचार मांडताना स्पष्ट केले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी दलित शोषित श्रमिक यांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत मांडला त्यांच्या व्यथा वेदना साहित्यातून व्यक्त केल्या व माणसांना खऱ्या अर्थाने त्यांच्या अस्तित्वाचे जाणीव करून दिल्ली त्यांनी आपल्या साहित्यातून शोषितांचा विचार मांडून प्रस्थापित व्यवस्थेला अस्वस्थ केले आपल्या लेखनाची दखल प्रस्थापित समाजातील साडेतीन टक्के वाल्या लोकांना घ्यायला भाग पाडले अशा या महान लेखकाचे साहित्य विश्वामध्ये जगामध्ये प्रसिद्ध झाले अशा महान साहित्यिकाचा विचार सर्वसामान्य माणसाने आत्मसात केला पाहिजे त्यांच्या विचारांच्या प्रेरणेने जपले पाहिजे पुढे बापूसाहेब कोकरे म्हणतात की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुरु मानून त्यांच्या प्रेरणेने साहित्य की रचना केली फकीरा सारख्या कादंबरीतून त्यांनी महानायक निर्माण केला या महानायक तून दलित शोषित पीडित श्रमिक यांच्यामध्ये बंडखोरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेणाऱ्या या अण्णाभाऊंनी लावणी पोवाडे शाहिरी काव्य वर्ग वगनाट्य कथा कादंबरी यासारख्या वांग्मय प्रकारातून शोषितांचा विचार प्रस्थापितांना पर्यंत पोहोचवला जगा पर्यंत पोहोचला आज आज देशामध्ये लाकडी फळीने आणि रबरी चेंडू नये खेळणाऱ्या व्यक्तींना जर राष्ट्र भूषण पुरस्कार मिळत असतील पद्मभूषण पुरस्कार मिळत असतील तरी ज्या व्यक्तींना श्रमिकांना जाणीव करून दिली की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नाही तर ती दलित शोषित पीडित यांच्या हातावर तरलेली आहे आहे असा विचार जगाला देणारे या महामानवाला विश्वरत्न पुरस्कार हा दिलाच पाहिजे असा आशावाद ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत बापूसाहेब पोकळे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला तालुक्यातील भाग्यविधाते फादर गणपतरावजी देशमुख उर्फ बाबासाहेब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व मनोगत अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष दामोदर साठे यांनी केले तर आभार विनोद रणदिवे यांनी कार्यक्रम सोशल डिस्टन्स पार पाडण्यात आला

Post a Comment

0 Comments