google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक! वडिलांच्या घरात चोरी, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking News

खळबळजनक! वडिलांच्या घरात चोरी, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

 खळबळजनक! वडिलांच्या घरात चोरी, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल 


मुलाने वडीलांच्या परस्पर रुमचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत रूममधील १५ हजार रुपये किमतीच्या दुचाकीसह, २० हजाराची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी असा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

वडिलांनी त्यास दुचाकी व अंगठी परत मागितली असता त्यांने न देता त्यांना दमदाटी केली. ही घटना १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास जवळा ता . सांगोला येथे घडली. याबाबत, रमेश बाबुराव सुरवसे यांनी मुलगा सदाशिव रमेश सुरवसे रा.दोघेही सध्या ( बोरीवली ) मुंबई यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

जवळा येथील रमेशबाबुराव सुरवसे यांचा मुलगा सदाशिव सुरवसे यांनी १५ मे ते १७ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास जवळा येथील राहत्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.वडील रमेश सुरवसे यांची एम.एच .०२ एबी ३८७ ९ ही दुचाकी व अर्धा तोळे सोन्याची अंगठी 2/4 त्यांच्या समंती वाचून, लबाडीने चोरली.

या घटनेची माहिती समजताच वडील रमेश सुरवसे यांनी मुलगा सदाशिव यास माझी दुचाकी व अंगठी मला परत दे असे म्हणाले असता मी देणार नाही , हे घर माझे आहे,तुम्ही तुमचे सामान घेवून मुंबईला निघून जावा , जर परत आला तर सोडणार नाही अशी दमदाटी केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments