google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 किसान रेल्वेमुळे सांगोल्याचं नाव देशात चर्चेत - चेतनसिंह केदार - सावंत

Breaking News

किसान रेल्वेमुळे सांगोल्याचं नाव देशात चर्चेत - चेतनसिंह केदार - सावंत

 किसान रेल्वेमुळे सांगोल्याचं नाव देशात चर्चेत - चेतनसिंह केदार - सावंत


सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : किसान रेल्वे हा शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लावू त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा उपक्रम सिद्ध झाला आहे . शेतकऱ्यांचा माल देशभरात पोहोचवणाऱ्या किसान रेल्वेची वर्षपूर्ती हे रेल्वेच्या इतिहासातील सुवर्णयुग आहे . सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब , द्राक्षे , खरबूज उत्पादक शेतकऱ्यांचा माल देशभरात पोहोचवणाऱ्या किसान रेल्वेमुळे सांगोल्याचं नाव देशभरात चर्चेत आले असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली .


सांगोला तालुक्यातसह सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब , द्राक्षे , पेरू , बोर , सिमला मिरची यासह इतर फळे , भाज्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगोला स्थानकातून किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे चेअरमन खासदार रणजितसिंह निंबाळकर , तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल , संजीव मित्तल यांच्याकडे मागणी केली होती . 


खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्याने 21 ऑगस्ट रोजी सांगोला स्थानकातून पहिली किसान रेल्वे धावली . त्यातच किसान रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या शेतमाल व फळांच्या वाहतुक खर्चावर पन्नास टक्के अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाने घेतला . आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत ऑपरेशन ग्रीन अंतर्गत पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .


 शेतकरी कमी किमतीत आपले उत्पादन बाजारात पाठवू शकणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली . तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कलकत्ता , बिहार , मुझफ्फरपूर , दिल्लीची बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार - सावंत यांनी सांगितले . शेतकऱ्यांचा शेतीमाल व फळे देशाच्या बाजारपेठेत जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान रेल्वे सुरू केली . सांगोला रेल्वे स्टेशनमधून चार किसान रेल्वे सुरू असून किसान रेल्वेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे . 


शेतीमाल कमी कालावधीत व अल्प दरात देशाच्या बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे . शेतकऱ्यांना कमी खर्चात शेतीमाल देशाच्या बाजारपेठेत पोहोचवणे सहज शक्य झाले आहे . किसान रेल्वे सुरू झाल्यानंतर वर्षभरात 36 लाख 61 हजार 967 बॉक्समधून 45 हजार 558 टन शेतीमाल वाहतूकीतून 21 कोटी 37 लाख 89 हजार 222 रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे . 


जलद वाहतूक , अपव्यय , 50 टक्के अनुदानासह शेती उत्पादनासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून किसान रेल्वेने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार - सावंत यांनी सांगितले .किसान रेल्वेच्या वर्षपूर्तीनिमित्त सांगोला रेल्वे स्थानकात केक कापून रेल्वेचे अधिकारी , चालक , कर्मचारी यांच्या भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी स्टेशन मास्तर एस.एन.सिंग , उद्योगपती अनिल ( बंडू ) केदार , कामगार वर्ग उपस्थित होता .

Post a Comment

0 Comments