महाविकास आघाडीविरोधात शेकाप - भाजप सांगोला नगरपरिषद निवडणुकीतील संभाव्य लढत ; इच्छुक मात्र ' वेट अँड वॉच'च्या भूमिकेत
सांगोला :-सांगोला नगरपरिषदेत राजकीय समीकरणे बदलली असून गतवर्षीचे सत्ताधारी व सध्याचे सत्ताधारी निवडणुकीत आमने- सामने येणार आहेत . शिवसेना , राष्ट्रवादी यांनी येणाऱ्या सर्व निवडणुका आघाडी करून लढविणार असल्याचे अगोदरच जाहीर केले आहे . तर विरोधात शेकाप , भाजप व इतर अशी आघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याबाबत चुरस निर्माण होणार आहे . सांगोला नगरपरिषदेत २०१६ च्या निवडणुकीत शेकाप , राष्ट्रवादी यांची आघाडीविरुद्ध सर्वपक्षीय महायुती अशी लढत झाली होती .
यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षा राणी माने याबहुमताने निवडून आल्या होत्या . एकूण २० सदस्य संख्यापैकी ८ नगरसेवक महायुतीचे निवडून आले होते . तर शेकाप आघाडीचे ११ नगरसेवक , तर एक अपक्ष असे बलाबल होते . विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे गटनेते आनंद माने व आ . शहाजीबापू पाटील यांच्यात मतभेद झाल्याने शिवसेनेशी फारकत घेत त्यांनी शेकापबरोबर जुळवून घेतल्याचे दिसून येत आहे . नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत आनंद माने गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करीत आपली पुढील वाटचाल कशी असेल , याबाबत संकेत दिले आहेत .
मागील निवडणुकीतनगराध्यक्षपद हे जनतेतून निवडून तर नगरसेवकांची प्रभागनिहाय निवडणूक झाली होती .आता येणारी निवडणूक वार्डनिहाय होणार असल्याने या निवडणुका अटीतटीच्या होतील . वार्ड रचनेत यंदा २ वार्ड वाढणार असल्याची शक्यता आहे . परंतु , याबाबत आताच काही बोलता येणार नाही , असे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले२०१ ९ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व प्रमुख पक्ष विरोधात असतानाही सांगोला शहरातून शेकापचे उमेदवार डॉ . अनिकेत देशमुख यांनी आ . शहाजीबापू पाटील यांच्यापेक्षा २ हजार १०० मतांची आघाडी घेतली होती .
कै . मा . आ . गणपतराव | देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच शेकाप निवडणुकीस सामोरा जात आहे . शेकापला मानणारा खूप मोठा गट शहरात आहे . मा.आ. गणपतराव देशमुख यांच्यानंतर शेकापची सर्व मदार डॉ . बाबासाहेब व डॉ . अनिकेत देशमुख या दोन बंधूंवर आहे . गेल्या काही वर्षापासून सर्वच निवडणुका खर्चिक होत असल्याने अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक तयारीस लागले आहेत
महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगोला नगरपरिषद ही दोन नंबरचीमोठी नगरपरिषद आहे . शहराच्या चारही बाजूने मोठ्या वसाहती व वाड्यावस्त्यांवर मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे . पण या भागात रस्ते , गटारी नसल्याने म्हणावा असा विकास झाला नाही . अल्पमत व बहुमताने गेल्या पाच वर्षांत शहराचा विकास खुंटला असल्याचे बोलले जाते
मागील निवडणुकीत कॅलिफोर्निया करू असे म्हणणारे परत शहराचा आम्हीच विकास करू शकतो , असेम्हणून मते मागताना दिसून येणार आहेत.शहरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे , अरुंद बोळामुळे शहरातील व्यापारी उपनगरात जात आहेत . शहरात पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांत नाराजी आहे . येणाऱ्या निवडणुकीत तेच - तेच प्रश्न व नेत्यांची ठरलेली गुळगुळीत उत्तरे यामुळे जनता कोणाच्या पारड्यात बहुमत टाकते , हे निवडणूक पूर्व पक्षीय आघाडी , युती यावर अवलंबून आहे .
0 Comments