भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पद्धतीने तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी साजरा होणार : अभिजीत पाटील !
सांगोला / प्रतिनिधी : सोलापूर जिल्हा ग्रामीण क्षेत्रामधील कोव्हिड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेङ्स व्यापलेल्या टक्केवारीनुसार शासनाने निश्चित केलेल्या एकूण पाच क्षेत्रापैकी सोलापूर जिल्हा सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय क्षेत्र वगळून ग्रामीण क्षेत्र तिसऱ्या स्तरांमध्ये येत आहे .
सद्यस्थितीत सांगोला तालुक्यामध्ये मागील आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने , तालुक्यात अधिक कडक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने , मा . जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सांगोला तालुक्यात अधिक कडक निबंध १३ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत .
त्या अनुषंगाने १५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७४ वा वर्धापन दिन तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत . त्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७४ वा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा होणार असल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सांगितलेआहे
केवळ तालुका मुख्यालयाच्या ठिकाणीच नेमून दिलेल्या वेळेत ध्वजारोहण करण्यात यावे . या ठिकाणी मा.आमदार , मा .. खासदार , उपविभागीय अधिकारी , उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार पोलीस स्टेशनचे अधिकारी , मुख्याधिकारी , नगराध्यक्षा , गटविकास अधिकारी पंचायत समिती सभापती यांनी उपस्थित रहावे . इतर मान्यवरांना वरिष्ठांच्या आदेशानुसार उपस्थित राहता येणार नाही . .
तसेच कवायत , संचलन व इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत . आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड -१ ९ च्या अनुषंगाने दिलेले सुरक्षित अंतर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत तसेच सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहिल याची दक्षता घेत , मा . जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सांगोला तालुक्यात साध्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे .
0 Comments