युवतीवर लैंगिक अत्याचार करून गुन्हेगाराने पोलिसांना मारले,
ठाणे जिल्ह्यात खळबळ ठाणे शहरातील एका युवकाने एका किशोर वयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, जाब विचारणाऱ्या तिच्या वडिलांना ही मारहाण केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यावर पोलीस उपनिरीक्षक यांना ही धक्काबुक्की करून, त्यांचा हात फॅक्चर केला आहे.
यासंदर्भात सदर युवकास अटक करून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील कोपरी परिसरात बुधवारी पहाटे एका १९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून त्या पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीला फटकारले होते. त्यानंतर सदर आरोपी युवकाने त्या मुलीच्या वडिलांना ही मारहाण केली होती. या वेळी शेजारच्या लोकांनी आरोपीला पकडून ठेवले होते
आणि पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सदर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेजारच्या लोकांनी त्याला पकडून, पोलिसांच्या हवाली केले.त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात पोलिस घेऊन आले होते. पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्यांने तिथे सुरक्षा कर्मचारी, पीडित तरुणी आणि तिच्या वडिलांना अर्वाच्य शिवीगाळ देण्यास सुरुवात केली होती. यासंदर्भात पोलीस ओपन निरीक्षकांनी त्याला गप्प बसण्यासाठी फटकारले असताना, त्याने सदर पोलीस उपनिरीक्षक यांना जोरात धक्का देऊन बाजूला पाडले. त्यामुळे त्यांच्या हाताचे हाड फॅक्चर झाले आहे.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यानंतर पोलिसांनी सदर युवकाला अटक केली आहे. त्याच्या विरोधात मुलीवर अत्याचार करून वडिलांना मारहाण करणे आणि एका पोलिस अधिकाऱ्याला त्याच्या कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल, भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments