google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तळीरामांसाठी गुड न्यूज ' .. आता किराणा दुकानातही मिळणार वाईन .. ! राज्य सरकारचे विशेष धोरण , नेमका काय प्रस्ताव आहे , जाणून घेण्यासाठी वाचा ..

Breaking News

तळीरामांसाठी गुड न्यूज ' .. आता किराणा दुकानातही मिळणार वाईन .. ! राज्य सरकारचे विशेष धोरण , नेमका काय प्रस्ताव आहे , जाणून घेण्यासाठी वाचा ..

 तळीरामांसाठी गुड न्यूज ' .. आता किराणा दुकानातही मिळणार वाईन .. ! राज्य सरकारचे विशेष धोरण , नेमका काय प्रस्ताव आहे , जाणून घेण्यासाठी वाचा ..


महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होते . त्यामुळे द्राक्ष उत्पादक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वाइनचीही निर्मिती महाराष्ट्रातच केली जाते . मात्र , या वाईनला म्हणावी तितकी मागणी नाही . त्यामुळे वाईनचा खप वाढविण्यासाठी राज्य सरकारने एक विशेष धोरण तयार केलंय.या ऑगस्ट महिन्यातच या धोरणाची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे . 2020-21च्या आकडेवारीनुसार , देशात उत्पादित होणाऱ्या परदेशी मद्याची विक्री 200 दशलक्ष लिटर झाली . देशी दारु 320 दशलक्ष लिटर , बीअर 30 कोटी लिटर , तर वाइनची केवळ 7 लाख लिटरच विक्री झाली . वाइनचे वर्गीकरण दारु म्हणून केले जाते . मात्र , अट्टल तळीरामांची पहिली पसंती दारुलाच असते . परिणामी , वाइनला म्हणावी तितकी मागणी नाही .सध्या वायनरीजमध्येच वाइनची विक्री होते . किरकोळ विक्रेत्यांना वाइन विक्रीचे परवाने दिल्यास वाइनची रिटेल आउटलेट्सही उघडता येतील . ' वॉक - इन स्टोअर ' कॅटेगरीत रिटेल आउटलेट्स , किराणा दुकाने , सुपर मार्केट्समध्येही वाईनची विक्री करता येईल . केवळ वाइन बार्सही उघडता येतील . राज्यात उत्पादित होणाऱ्या वाइनवर गेली 20 वर्षे उत्पादनशुल्क आकारलं जात नव्हतं . मात्र , आता ते 10 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे . त्यातून मिळणारी काही रक्कम वाइन बोर्डाला देण्याचा सरकारचा विचार आहे . वाइनचा दर्जा , मार्केटिंगवर हे बोर्ड काम करील दरम्यान , देशात आजघडीला एकूण 110 वायनरीज आहेत . पैकी सर्वाधिक 72 वायनरीज एकट्या महाराष्ट्रात आहेत . मात्र , त्यातील केवळ 20 वायनरीज वाइन उत्पादन घेतात . अन्य वायनरीज मोठ्या उत्पादकांसाठी काँट्रॅक्टवर उत्पादन करतात . नाशिक ' वाइन अँड ग्रेप कॅपिटल ऑफ इंडिया ' नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होत असल्याने तेथे सर्वाधिक वायनरीज आहेत . त्यामुळे नाशिकला ' वाइन अँड ग्रेप कॅपिटल ऑफ इंडिया ' असंही म्हटलं जातं . त्याखालोखाल सांगली , पुणे , सोलापूर , बुलढाणा आणि अहमदनगर या जिल्ह्यांत वायनरीजची संख्या आहे .

Post a Comment

0 Comments