चि. उत्कर्ष आडसुळ याचा नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्याहस्ते सत्कार संपन्न
सांगोला/ प्रतिनिधी :सांगोला शहरातील चि.उत्कर्ष संतोष आडसूळ याने 12 वी(सायन्स) परिक्षेमध्ये 99% गुण मिळवून सांगोला तालुक्यात प्रथम आणि इलेक्ट्रॉनिक विषयात 200 पैकी 200 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सांगोला नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने आणि गटनेते तथा नगरसेवक आनंदा(भाऊ) माने यांनी त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.उत्कर्ष याचे वडील संतोष आडसुळ हे एस. टी. महामंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. तसेच राज्यातील सीओईपी कॉलेज याठिकाणी इंजिनीअरिंग करण्याचा इच्छा असल्याचेही यावेळी उत्कर्षने सांगितले.
0 Comments