राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती
सध्या राज्यात इयत्ता आठवीत ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु आहेत. मात्र आता येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व शाळा सुरु होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.राज्यात अनेक दिवसांपासून शाळा बंद आहेत. मात्र आता येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शाळा सुरु करण्यावर विचार सुरु आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी सध्याची कोरोनास्थिती तसेच बंद असलेल्या शाळांवर भाष्य केले. शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार“राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा राज्याच्या शिक्षण विभागाचा विचार आहे. येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा विचार करत आहोत. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे. तसेच नियम शिथील केलेले आहेत, अशा ठिकाणी आम्ही ग्रामीण भागात पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचा विचार करत आहेत. तसेच शहरी भागात आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा आमचा मानस आहे. येणाऱ्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा आमचा विचार आहे,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली तसेच 1 ऑगस्टला ब्रेक द चेनअंतर्गत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. मागील वर्षाच्या मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा कोरोनामुळे बंद आहेत. त्यामुळे आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरु आहेत. असेही गायकवाड म्हणाल्या.मुख्यमंत्र्यांकडून आदेश आल्यावर अंमलबजावणी दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील सर्व खासगी शाळांचे शुल्क 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार याबाबत गायकवाड यांनी भाष्य केलं. 15 टक्के फी कमी करण्याचा निर्णय झालेला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून आदेश आल्यावर त्याची अंमलबजावणी होईल, असे गायकवाड यांनी सांगितलं.
0 Comments