google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खासगी शाळांचा फी कपातीला ठेंगा शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावल्या ३३५ शाळांना नोटिसा

Breaking News

खासगी शाळांचा फी कपातीला ठेंगा शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावल्या ३३५ शाळांना नोटिसा

 खासगी शाळांचा फी कपातीला ठेंगा शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावल्या ३३५ शाळांना नोटिसा


सोलापूर :  शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक शुल्कात १५ टक्के फी कपात करण्याचा आदेश काढला आहे . मात्र , शाळांनी पालकांकडून पूर्वीप्रमाणे फी वसूल करत शासनाच्या आदेशाला ठेगा दाखवला आहे . कोरोनामुळे जवळपास गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत . 


विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे . परिणामी विद्यार्थी शाळेत जात नसल्याने विविध प्रकारच्या शुल्कात माफी मिळण्याची मागणी पालकांकडून केली जात होती . अनेक शाळांकडून फी वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या पालकांच्या तक्रारी शिक्षणाधिकारी ,शिक्षणमंत्र्यांकडे गेल्या होत्या . त्यामुळेशालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात १५ टके फी कपात करण्याचा आदेश दिला आहे . 


असे असतानादेखील बऱ्याच खासगी शाळांमधून सध्याही पूर्वीप्रमाणेच फी वसुली सुरू असल्याच्या तक्रारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे पुन्हा गेल्या आहेत . परिणामी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी खासगी सर्वच ३३५  शाळांना याबाबत नोटिसा बजावल्या  आहेत . ज्या शाळांकडून सवलत दिली जात नाही त्या शाळांच्या तक्रारी  शिक्षण विभागाकडे करण्याचे आवाहन  शिक्षणाधिकारी राठोड यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments