चारा छावण्यांची प्रलंबित अनुदान व अनामत रक्कम शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील एप्रिल २०१ ९ ते ऑगस्ट २०१ ९अखेर वित्तीय वर्ष २०१ ९ -२० या कालावधीतील चारा छावण्यांचे एकूण अनुदानापैकी ७ ९ कोटी ८५ लाख अनुदान देण्यात आले असून उर्वरित २२ कोटी ५४ लाख इतकी अनुदानाची रक्कम शासनास परत पाठवली होती त्यामुळे चारा छावणी चालविणाऱ्या संस्थांची बरीच मोठीरक्कम आजतागायत शासनाकडून येणे आहे
ही अनुदानाची रक्कम तातडीने सर्व चारा छावण्यांना मिळवून देण्याकरता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा करीत असून लवकरच ही सर्व रक्कम संबंधित चारा छावण्यांना मिळेल असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले . सांगोला तालुक्यातील चारा छावण्या साठी एकूण १०२ कोटी२८ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले होते यापैकी ७ ९कोटी ८५ लाख रुपये अनुदान चारा छावण्यांना अदा केले आहे
व उर्वरित २२ कोटी ५४ लाख रुपये ऑफलाइन पद्धतीने असल्याने वाटप करता येत नसल्यामुळे शासनाला परत पाठवले होते त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील चारा छावण्यांच्या अनुदानाची रक्कम शासनाकडून येणे असल्याने बऱ्याच छावणी चालकांना प्रचंड आर्थिक ताण सोसावा लागला आहे ही रक्कम शासनाकडून परत मिळवण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागील एक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत असून या पाठपुराव्याला लवकरच यश येईल व तालुक्यातील सर्व चारा छावणी संस्थांची अनुदान व अनामत रक्कम लवकरच परत मिळेल असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला .
0 Comments