google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तीन तालुक्यांत सोमवारपासून कडक लॉकडाउन ?

Breaking News

तीन तालुक्यांत सोमवारपासून कडक लॉकडाउन ?

 तीन तालुक्यांत सोमवारपासून कडक लॉकडाउन ?


 ग्रामीणमध्ये कमी झालेला कोरोना आता पुन्हा डोके वर काढू लागला आहे . सोलापूर : ग्रामीणमध्ये कमी झालेला कोरोना  आता पुन्हा डोके वर काढू लागला आहे . दररोज सरासरी साडेपाचशे ते सहाशे रुग्ण वाढत असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस  , पंढरपूर व माढ्यात मोठी रुग्णवाढ आहे . तर करमाळा , सांगोला  या तालुक्यांमध्येही कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळत आहेत . शुक्रवारी ग्रामीणमध्ये 578 रुग्ण वाढले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे . रुग्ण वाढत असताना प्रशासन वेळकाढूपणा करणार नाही , त्यामुळे पहिल्या टप्प्यात तीन तालुक्यांमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाउन  होण्याची शक्यता आहे .सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक तीन , सात , दहा , 15 ते 17 आणि 23 ते 25 मध्ये 12 रुग्ण आढळले आहेत . तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . ग्रामीणमध्ये शुक्रवारी सर्वाधिक 154 रुग्ण माढा तालुक्यात तर पंढरपूर तालुक्यात 126 आणि माळशिरस तालुक्यात 122 रुग्ण वाढले आहेत . अक्कलकोट व दक्षिण सोलापुरात प्रत्येकी दोन , उत्तर सोलापूर तालुक्यात तीन , बार्शीत 31 , करमाळ्यात 57 , मोहोळ तालुक्यात 38 , सांगोल्यात 46 रुग्ण आढळले आहेत . ग्रामीणमधील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या चार हजार 476 झाली असून शहरातील 69 रुग्णांवरही उपचार सुरू आहेत . म्युकरमायकोसिसचा शुक्रवारी एक रुग्ण वाढला असून या आजाराच्या रुग्णांची संख्या आता 626 झाली आहे . सद्य : स्थितीत 24 रुग्णांवर उपचार सुरू आहेत . ऍक्टिव्ह रुग्णांची ( उपचार घेणारे रुग्ण ) संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची भूमिका घेतली आहे . परंतु , संपूर्ण तालुक्यात की रुग्ण वाढत असलेल्या गावांमध्येच कडक निर्बंध असतील , याची उत्सुकता आहे .होम क्वारंटाइनच्या निकषांचे पालन नाहीच आतापर्यंत ग्रामीण भागातील तब्बल 25 लाख 22 हजार 432 संशयितांना होम क्वारंटाइन करण्यात आले . सध्या त्यापैकी 14 हजार 787 संशयित होम क्वारंटाइन आहेत . तर अडीच लाखांहून अधिक जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले . एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यक्तींना क्वारंटाइन करूनही रुग्णसंख्या कमी करण्यात प्रशासनाला यश मिळालेले नाही . खेड्यापाड्यातील लोक मास्क वापरत नाहीत , नियमांचे पालन करत नाहीत , असा ठपका ठेवून तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाने कडक लॉकडाउनच्या दिशेने पाऊल उचचले आहे . पुढील आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय होणार आहे .

Post a Comment

0 Comments