google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग राज्य उपाध्यक्ष पदी ॲड महादेव कांबळे यांची निवड...

Breaking News

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग राज्य उपाध्यक्ष पदी ॲड महादेव कांबळे यांची निवड...

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग राज्य उपाध्यक्ष पदी ॲड महादेव कांबळे यांची निवड...


मुंबई- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग, राज्य अध्यक्ष  माननीय विद्या कदम  मॅडम यांनी ॲड महादेव कांबळे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग राज्य उपाध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र दिले आहे. त्यानिमित्त सांगोला येथे  त्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आमदार माननीय जयंत आसगावकर, प्रांतिक सदस्य मा प्रा.पी.सी. झपके सर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा. प्रकाशजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील तालुकाध्यक्ष मा.सुनिल भोरे, सोशल मीडियाचे दत्ता देशमुख, शहराध्यक्ष तोहीद  कृष्णा भजनावळे मुल्ला ,रवीप्रकाश साबळे, ओबीसी सेल सेलचे  फिरोज मनेरि, चांद शेख रवी साबळे दत्ता वाघमारे दत्ता मस्के कृष्णा भजनावळे व इतर मान्यवर उपस्थित होते. महादेव कांबळे हे प्रभावी वक्ते, प्रसिद्ध साहित्यिक आहेत. त्यांचे संघटन कौशल्य उत्तम आहे.

सांस्कृतिक विभागाचे वतीने उपक्रम आयोजित करून कॉंग्रेस पक्ष वाढी साठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी  सांगितले. देशाचे माजी गृहमंत्री माननीय सुशील कुमारजी शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती ताई शिंदे, सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश अध्यक्ष विद्या ताई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी मनोगतातून व्यक्त केले सदर निवडीचे सांगोला व सोलापूर जिल्हा पदाधिकारी  कार्यकर्त्यांनी स्वागत आणि अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments