सांगोला तालुक्यातील 18 गावांमध्ये कंटेनमेंट झोन: प्रांताधिकारी उदयसिंह भोसले
सांगोला प्रतिनिधी : सांगोला तालुक्यांमध्ये दहापेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या 18 गावांमध्ये संपूर्ण गावांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
सांगोला तालुक्यांमध्ये सध्या एकूण 502 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात एकूण आतापर्यंत 148 जणांचा कोटोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली असून 11 हजार 681 जणांनी करोनावर मात केली आहे. तालुक्यात काही गावांमध्ये सतत रुग्णवाढ होत आहे. तालुक्यातील दहापेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या 18 गावांमध्ये संपूर्ण कंटेनमेंट घेऊन जाहीर करून त्या गावांमध्ये संसर्ग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशा गावांमधील ग्रामस्तरारीय कृती समितीने बंदच्या आदेशाचे कडक अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिले आहेत. या आदेशाचे पालन कोणी करत नसेल तर त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची सुचना ग्रामस्तरीय कृती समिला दिल्या आहेत.
संपूर्ण कंटेनमेंट झोन जाहीर केलेली गावे
कडलास, महूद, शिरभावी, अकोला, सोनंद, चोपडी, सावे, डोंगरगाव, जवळा, धायटी, एखतपुर, कमलापूर, खवासपूर, संगेवाडी, शिवणे, हलदहिवडी, मेडशिंगी, आणि पाचेगाव बुद्रुक,
संपूर्ण तालुक्यात निर्बंध शिथिल केले असले, तरी रुग्ण वाडीच्या गावांमध्ये कंटेनमेंट झोन कडक करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे अन्यथा नियम मोडणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.
अभिजीत सावर्डे-पाटील, तहसीलदार, सांगोला
0 Comments