google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जय मल्हार क्रांती संघटनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर, जिल्हा अध्यक्षपदी उमेश मंडले (पंढरपूर विभाग) तर महादेव जाधव (माढा) यांची निवड !

Breaking News

जय मल्हार क्रांती संघटनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर, जिल्हा अध्यक्षपदी उमेश मंडले (पंढरपूर विभाग) तर महादेव जाधव (माढा) यांची निवड !

 जय मल्हार क्रांती संघटनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर, जिल्हा अध्यक्षपदी उमेश मंडले (पंढरपूर विभाग) तर महादेव जाधव (माढा) यांची निवड !


सांगोला / प्रतिनिधी ;- जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर समाज कार्य सुरू आहे. गेल्या काही वर्षात संघटनेच्या माध्यमातून केलेल्या समाज उपयोगी विधायक कामामुळे या संघटने विषयी असणारा विश्वास दिवसोंदिवस समाजाप्रती वाढत आहे. त्यामुळे संघटनेचे देह धोरण जाहीर करण्यात आले आहे.

याचाच भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनेच्या पदाधिकारी निवडी करण्यात येत आहेत.दि.२४ ऑगस्ट रोजी टेंभुर्णी येथे संघटनेचे सोलापूर निरीक्षक बापूसाहेब शिरतोडे संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष अंकुश रावजी जाधव सर राज्याचे कार्याध्यक्ष संजय नाना जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी उमेश मंडले पंढरपूर विभाग महादेव जाधव माढा विभाग यांची एक मताने निवड करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, पंढरपूर ,करमाळा, मंगळवेढा ,माढा, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर,या  तालुक्यातील पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या .

Post a Comment

0 Comments