गौडवाडी ता.सांगोला बुध्देहाळ तलावात युवकाचा खुन करणारे आरोपीना पोलिसांनी केली अटक..
गौडवाडी ता.सांगोला यांनी सांगोला पोलीस ठाणेश नगूद गुन्हयातील पुरुष जातीच्या अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे अनोळखी मयत इसमास कोणीतरी अज्ञात त्यक्तीने , अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने डोके , हात कापुन खुन केला व पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने डोक नसलेले खांदयापासुन खालील भाग असलेले प्रेत हिरवे - पांढरे रंगाच्या चटईमध्ये व निळ्या व लाल रंगाच्या शेडनेटमध्ये सफेद रंगाच्या सुताच्या दोरीने बांधुन त्यास सुमारे १० ते १२ किलो वजनाचा दगड दोरीने बांधुन मौजे - गोडवाडी ता.सांगोला गावच्या शिवारात बुध्देहाळ तळयातील पाण्यात टाकुन दिले आहे . अशी फिर्याद अज्ञात आरोपीविरुद्ध दिल्याने वर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मा . सुहास जगताप सो पोनि सांगोला यांच्या आदेशाप्रमाणे सपोनि प्रशांत हुले यांच्याकडे तपास देण्यात आला . गुन्हयाचा सर्वतोपरीने तपास करीत असताना अनोळखी मयत व आरोपी यांची ओळख पटविणेकरीता सांगली , कोल्हापुर सोलापुर जिल्हयात पोलीस पथके पाठवुन सर्व जिल्हयात याबाबत प्रसिध्दी करण्यात आली . त्याप्रमाणे सांगली पोलीसांनी त्यांच्या हद्दीत राहणारा १ ) विलास बाबू सरगर , वय ४५ वर्षे , रा.कवलापूर , ता . मिरज , जि.सांगली हा संशयित इसम ताब्यात घेवून सांगोला पोलीसांच्या ताब्यात दिल्यानंतर सांगोला पोलीसांनी कौशल्याने व तांत्रिक दृष्टया तपास करून गुन्हयातील इतर आरोपीत नामे २ ) उत्तम महादेव मदने , वय २७ वर्षे , सध्या रा.डेरवली , राम मंदीर जवळ , माऊली सदन , उरण पनवेल , मुळ रा.लक्ष्मीनगर , दगडे प्लॉट , सांगली , जि . सांगली , ३ ) प्रकाश गोरख कोळेकर , वय २४ वर्षे , रा.कराडवाडी , कोळा , ता.सांगोला , ४ ) संतोष विठ्ठल पांढरे , वय २६ वर्षे , रा.कराडवाडी , कोळा , ता.सांगोला , ५ ) वैभव तानाजी आलदर , वय १ ९ वर्षे , रा.कराडवाडी , कोळा , ता . सांगोला यांना निष्पन्न करून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने व त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली . मा . प्रथमवर्ग व्यायदंडाधिकारी श्रीमती देशमुख मॅडम सांगोला कोर्ट यानी सदर आरोपीना दि . ०१ ऑगस्ट अखेर पोलीस कोठडी दिलेली आहे . सदर गन्हयाच्या तपासात न्यायसहायक वैज्ञानीक प्रयोगशाळा सोलापर येथील श्री गणेश कदम त्याच्या पथकाच्या मदतीने सेम्पल्स घेणे व तपास चालु आहे . गुन्हयातील मयत नामे विजय विलास सरगर वय २१ वर्ष , हा आरोपी विलास सरगर याचा मुलगा असुन त्यास मारण्याचा आरोपीनी पुर्वनियोजित कट फोनद्वारे कोळा या ठिकाणी रचून आरोपी नामे विलास सरगर याने विजय याचा खून करण्यासाठी पैश्याची सुपारी उत्तम मदने , प्रकाश कोळेकर , संतोष पांढरे व वैभव आलदर यांना दिली त्याप्रमाणे त्यानी विजय विलास सरगर यास दिनांक ११/०७/२०२१ रोजी डाळींबाची स्वस्त खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यास त्याचे वापरते टमटम सह कोळा येथे बोलावून त्यांनी त्याचे सोबत यश हॉटेल कोळा येथे जेवण करुन ठरलेल्या कटाप्रमाणे त्यास रात्री २३:00 व ते .२४ : ०० व चे दरम्यान यश हॉटल , कराडवाडी , कोळा च्या अंदाजे अर्धा किलो मीटर पाठीमागे मोकळ्या रानात कोयत्याने त्याचे मुंडके तोडून त्याचा खून करून त्याचा मृतदेह बटई व शेडनेटमध्ये पांढन्या रंगाच्या दोरीने बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बुध्देहाळ तळयात दगड बांधून टाकून दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . सदर गुन्हयाचा तपास श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम , पोलीस अक्षीक्षक , सोलापूर ग्रा . , श्री.अतुल झेंडे सो l , अपर पोलीस अधीक्षक , सोलापूर ग्रा , श्रीमती राजश्री पाटील मॅडम , उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा , पोनि श्री सुहास जगताप सो , यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.प्रशांत हुले हे करीत असून त्यांना सपोफौ.कल्याण ढवणे , पोहेकॉ.राजू चौगुले , पोना . विजय थिटे , पोना.दत्तात्रय वजाळे , पोना.आप्पा पवार , पोकॉ . लक्ष्मण वाघमोडे , पोकॉ.गणेश कुलकर्णी , पोकॉ . गणेश कोळेकर , सायबर पो.ठाणेचे पोकॉ / अनवत अत्तार , चापोकॉ . सुनिल लोंढे , वापोहेकॉ.मनोहर भुजबळ यांनी गुन्हयाच्या तपासकामी मदत केलेली आहे . ( सुहास जगताप ) पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे
0 Comments