लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका यांच्यावतीने मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन
मुख्यमंत्री साहेब यांना तहसीलदार साहेब यांच्यामार्फत देण्यात आले.लहुजी शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष मातंग रुदय सम्राट लहु श्री विष्णू भाऊ कसबे साहेब यांच्या व लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी अध्यक्ष लहुश्री कैलास दादा खांदारे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे अनेक वर्षाच्या प्रलंबित असलेल्या मातंग समाजाच्या मागण्यांचे निवेदन
1 अनुसूचित जाती साठीच्या उपलब्ध आरक्षणाचे अ ब क ड वर्गीकरण करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण प्रदान करण्यात यावे.
2 जगविख्यात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे.
3 आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोग च्या सर्व शिफारसी प्रभावी पणे अंमलबजावणी करण्यात यावी. यासह इतर मागण्यांचे निवेदनआज दिनांक 29/7/2021 रोजी लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना मा.तहसिलदार साहेब सांगोला तहसील कार्यालय सांगोला यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका अध्यक्ष मा.संजय भाऊ फाळके सांगोला तालुका युवक अध्यक्ष आप्पासो वाघमारे सांगोला तालुका युवक कार्याध्यक्ष राम भाऊ साठे सांगोला शहर मा अध्यक्ष गोरख भाऊ रणदेवे सांगोला तालुका संघटक आमित भाऊ वाघमारे यांच्यासह लहुजी शक्ती सेना चे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments