google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भाजपच्या आमदारांचे निलंबन ही लोकशाहीची गळचेपी – चेतनसिंह केदार

Breaking News

भाजपच्या आमदारांचे निलंबन ही लोकशाहीची गळचेपी – चेतनसिंह केदार

 भाजपच्या आमदारांचे निलंबन ही लोकशाहीची गळचेपी – चेतनसिंह केदार

सांगोला प्रतिनिधी: भाजपच्या आमदारांनी ओबीसीचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्याचे प्रश्न आदी प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आक्रमकपणे आवाज उठविला. राज्यात सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या  महाविकास आघाडी सरकारने स्वतःचे अपयश झाकण्यासाठी भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केले ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केला आहे. भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.विधीमंडळात भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केल्यामुळे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, राज्यात जनतेचे शेकडो प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे राज्य सरकार कोरोनाच्या आडून अधिवेशन घेण्याचे टाळत आहे. मुळातच महाविकास आघाडी शासनात एकमत नसल्याने अपयश झाकण्यासाठी अधिवेशन कमी कालावधीत आटोपण्याचा घाट घातला आहे. भाजपच्या आमदारांनी ओबीसीचे राजकीय आरक्षण मराठा आरक्षण तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्याचे प्रश्न आदी प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आक्रमकपणे आवाज उठविला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार उघडे पडले आहे.स्वतःचे अपयश झाकण्यासाठी भाजपच्या बारा आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करून आघाडी सरकारने एक प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेची केलेली फसवणूक आम्ही समोर आणू या भीतीनेच आमच्या १२ आमदारांवर कारवाई केली आहे. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातील प्रत्येक समाजघटकाची फसवणूक करत आहे. ही फसवणूक भाजपचे आमदार उघड पाडतील या भितीतूनच खोटे आरोप रचून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ओबीसी व मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारला उघडे पाडल्यामुळे खोटे आरोप करून राज्य सरकारने भाजपच्या आमदारांचे निलंबन केले आहे. अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडले जाऊ नयेत, यासाठी हा आटापिटा सुरू आहे.मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप झगडत असताना भाजप आमदारांवर अशा प्रकारची कारवाही होणे चुकीचे आहे, अशा प्रकारच्या कितीही कारवाया झाल्या तरी भाजप सहन करेन. पण मराठा समाज व ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत भाजपचा संघर्ष सुरुच राहील. आघाडी सरकारने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, किसान मोर्चा प्रदेश कार्यकारी सदस्य शिवाजीराव गायकवाड, शहराध्यक्ष आनंद फाटे,ओबीसी सेल ता.अध्यक्ष शिवाजी आलदर,युवा मोर्चा ता.अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, मागासवर्गीय ता.अध्यक्ष तानाजी कांबळे, डॉ. विजय बाबर, एन वाय भोसले, डॉ. अनिल कांबळे, विलास व्हणमाने,माणिक सकट, वसंत सुपेकर, नागेश जोशी, लक्ष्मीकांत लिगाडे, मानस कमलापूरकर,संजय गंभीरे, अजित तेवते, संग्राम गायकवाड, बाळू गाडे, राहुल व्हनमाने, देविदास कांबळे, राहुल मंडले, निलेश गायकवाड,ओंकार कुलकर्णी, उमेश मंडले, दीपक केदार,अवधूत केदार,बाळासो चव्हाण यांच्या सह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments