सोलापूर | सोलापूर जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र सुरु
अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या र्व विभागातील बदलीस पात्र असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची प्रशासकीय किंवा विनंती बदली समुपदेशन द्वारे करण्यात येत आहे .३१ जूलै रोजी अर्थ , बांधकाम , लघुपाटबंधारे , ग्रामीण पाणी पुरवठा कृषी , पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्याच्या बदल्या करण्यात येणार आहेत . सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यात येत आहेत.शुक्रवारी जि.प.मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ऑन व्हीडीओ कॅमेऱ्या समोर बदली प्रक्रीया सामान्य प्रशासनाच्या वतीने पार पडत आहे . सकाळ पासूनचं ग्रामीण भागातून आलेल्या कर्मचाऱ्यांनी बदली मिळविण्यासाठी गर्दी केली आहे .कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे . प्राथमिक शिक्षण विभाग- विस्तारधिकारी केंद्रप्रमूख , ग्रामपंचायात विभाग विस्तारधिकारी , ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक , आरोग्य विभाग- औषध निर्माण अधिकारी , आरोग्य पर्यवेक्षिका , आरोग्य सेवक , आरोग्य सहाय्यीका , महीला व बालकल्याण विभाग - सहाय्यक बालविकास प्रकल्पधिकारी , अंगणवाडी पर्यवेक्षिका , सामान्य प्रशासन विभाग- वरिष्ठ प्रशासनधिकारी , कनिष्ठ प्रशासनधिकारी , वरिष्ठ सहाय्यक , कनिष्ठ सहाय्यक , परिचर , वाहनचालक , या सर्व विभागातील बदलीस पात्र असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची प्रशासकीय किंवा विनंती बदली समुपदेशन द्वारे करण्यात येत आहे .३१ जूलै रोजी अर्थ बांधकाम , लघुपाटबंधारे , ग्रामीण पाणी पूरवठा , कृषी , पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्याच्या बदल्या करण्यात येणार आहेत
0 Comments